Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, 'हे' जिल्हे तापमानाने उकडणार

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात काही प्रमाणात बदल घडलेला दिसून येत आहे. अशातच जाणून घेऊया सध्या 6 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather  (AI Photo)
Maharashtra weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यातील वातावरणात काही प्रमाणात बदल

point

6 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात काही प्रमाणात बदल घडलेला दिसून येत आहे. काही ठिकाणी उष्ण-दमट हवामानाची शक्यता आहे, तर राज्यातील पाऊस हा एल निनो मुळे गायब झाल्याची शक्यता आहे. यामुळे 2026 या वर्षात हिवाळा ऋतुत देखील तापमान सक्रीय राहणार असल्याची दाट शक्यता आहे. अशातच जाणून घेऊया सध्या 6 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे ही वाचा : .. तर मी कोणाचेही पाय धरायला तयार - राज ठाकरे

कोकण 

कोकणात मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविलेला आहे. रायगड, रत्नागिरी येथे उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे, तर सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गाला पावसाचा यलो अलर्ट आहे.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

या विभागात पुण्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.