Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार थैमान
Maharashtra weather : राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे, तर काही भागांना हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 22 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे, तर काही भागांना हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 22 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSI विजय सांगडे यांचे निधन, ड्युटीवर जाण्यापूर्वी कुटुंबीयांना सांगितली 'ती' गोष्ट
कोकण
कोकण विभागात पालघर जिल्ह्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि जळगाव येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर जळगाव जिल्ह्यात विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
