Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा दुहेरी संकट, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट जारी
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता जारी करण्यात आली. तसेच राज्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसह काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात उष्णतेची तीव्रता अधिक
काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढेल अशी शक्यता आहे. राज्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसह काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये वातावरण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज जारी करण्यात आला. जाणून घेऊयात 9 एप्रिल रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : पुणे-पिंपरी चिंचवडमधील जोडणारा नवा सेतू वाहतुकीसाठी खुला, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलं होतं उद्घाटन
कोकण
कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा अधिकचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी पावसाची अधिक शक्यता जारी करण्यात आली आहे. याच विभागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाडा अधिक जाणवणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत दुपारनंतर वातावरण ढगाळ होणार असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज जारी केला.
मराठवाडा
मराठवाडा विभागात हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. या विभागातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला.









