Maharashtra Weather : सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस... राज्यातील 'या' भागांना आज IMD चा इशारा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाचा कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार इशारा? 

point

मुंबईत पुढील 2 दिवस कसं असं वातावरण?

Maharashtra Weather Update : आज (01 नोव्हेंबर 2024) लक्ष्मी पूजनाचा दिवस...राज्यात थंडीची चाहूल लागत असतानाच फटाक्यांच्या धुरामुळे उष्णता आणि प्रदूषण वाढलं आहे. यासर्वात राज्याच्या अनेक भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागावर आज वादळी पावसाचे सावट राहणार आहे.(maharashtra weather forecast update Today 1 november rain alert in diwali to these districts IMD report mumbai kokan pune)

ADVERTISEMENT

राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप पाहायल्या मिळत असली तरी अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात कमालीची उष्णता वाढली आहे. या भागात कोरडं हवामान राहणार आहे. 

हेही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana Status Check: अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच काम करा अन्...

हवामान विभागाचा कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार इशारा? 

आज कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीत विजांचा धुमधडाका आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल. विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी देखील वादळी पावसाची हजेरी लागू शकते. त्यानुसार, या भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आह. तर उर्वरित भागात पावसाच्या हलक्य सरी कोसळू शकतात.

हेही वाचा : Diwali Laxmipujan 2024 Date : आज 'इतक्या' तासांसाठी आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजा विधी

मुंबईत पुढील 2 दिवस कसं असं वातावरण?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज (शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024) हवामान सामान्यतः ढगाळ राहील. कमाल तापमान 30.71 अंश सेल्सियस तर किमान तापमान 28.37 अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे. मुंबईत आज पावसाची शक्यता नाही.

ADVERTISEMENT

शनिवार - शहराचे हवामान ढगाळ राहील. तर कमाल तापमान 31.21 अंश सेल्सियस असेल. किमान तापमान 28.22 अंश सेल्सियसपर्यंत राहू शकतं.

ADVERTISEMENT

रविवार - शहरात हवामान आज शक्यतो ढगाळ राहील. कमाल तापमान 31.48 अंश सेल्सियस इतके राहील. तर किमान तापमान 27.73 अंश सेल्सियस असू शकते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT