Maharashtra Weather : राज्यात येतंय संकट, 'या' जिल्ह्यांत संमिश्र हवामान

Maharashtra Weather : राज्यात सध्या पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. अशातच जाणून घ्या 21 नोव्हेंबर 2026 रोजीचे हवामान.

ADVERTISEMENT

Maharashtra weather (AI Photo)
Maharashtra weather (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असे संमिश्र हवामान

point

21 नोव्हेंबर 2026 रोजीचे हवामान

Maharashtra Weather : राज्यात सध्या पहाटे गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारी दि. 21 नोव्हेंबर कोकणापासून विदर्भापर्यंत राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे अनेक ठिकाणी धुके आणि गारवा जाणवेल, तर दुपारच्या सत्रात उष्णता कायम राहील.

कोकण आणि मुंबई 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामानाचा कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मुंबईत सकाळच्या सत्रात धुके किंवा धूसर वातावरण पाहायला मिळेल, तर त्यानंतर दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

पश्चिम महाराष्ट्र 

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. पहाटे गारवा आणि दिवसा उन्हाचा चटका जाणवेल, तर दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

उत्तर महाराष्ट्र 

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा जोर जाणवेल, तर दिवसा आकाश निरभ्र राहील. नाशिकमध्ये किमान तापमान सुमारे 12 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या विभागासाठीही कोणताही हवामान इशारा नाही.

मराठवाडा :

छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी धुके किंवा धूसर वातावरण राहून नंतर आकाश निरभ्र होईल. येथे किमान तापमान 17 अंश, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

विदर्भ :

अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामान कोरडे राहील. येथे रात्री आणि पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव येईल. दरम्यान, गुरुवारी चंद्रपूरमध्ये किमान 15 अंश, तर कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.