Maharashtra Weather : पुढील काही तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही, IMD चा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : 5 ऑगस्ट 2026 रोजी राज्यात पावसाची स्थिती स्थिर जाणून येतो. अशातच जाणून घेऊयात 6 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केलाय. 

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानाचा अंदाज

point

6 ऑगस्ट 2026 रोजी कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. तर काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार तर कुठे पावसाचा यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. 5 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाची स्थिती स्थिर जाणून येतो. अशातच जाणून घेऊयात 6 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केलाय. 

हे ही वाचा : पुणे: कौटुंबिक वाद चिघळला, नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं

कोकण 

कोकणातील पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तविण्यात आलाय, तर ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि अहिल्यानगरात हलका ते मध्यम पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता. नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलक्या पावसासह वादळी वाऱ्याची  अधिक शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.  

पश्चिम महाराष्ट्र 

पुण्यात हलका ते मध्यम पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसर आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे.  कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येतेय.