पुणे: कौटुंबिक वाद चिघळला, नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं

ओमकार वाबळे

Pune Crime : पुण्याच्या लोहगाव परिसरात मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. कौटुंबिक वादातून एका महिने कथितरित्या आपल्याच नात्यातील नऊ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेवी क्विक ओतलं.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कौटुंबिक वादाचा लहान बाळावर राग

point

9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक टाकलं

Pune Crime : पुण्याच्या लोहगाव परिसरात मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. कौटुंबिक वादातून एका महिने कथितरित्या आपल्याच नात्यातील नऊ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेवी क्विक ओतलं. चिमुरड्या मुलाची प्रकृती बिघडलेली आहे. त्याला आयसीयूमध्ये पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं लोहगाव परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, आरोपी एका मुलीचा निघाला बाप

कौटुंबिक वादातून 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक टाकलं

लोहगावातील कलवाड वस्तीतील रहिवासी अल्ताफी नदीम शेखने या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोहगाव पोलिसांनी कलवाड वस्तीतील रहिवासी सानिया शेख आणि मुंबईच्या कांदिवली येथील रहिवासी रियाज इमाम हलालकर आणि हाजी मलंग शेख विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीच्या माहितीनुसार, अल्ताफ शेख आणि त्याचा भाऊ एकाच कुटुंबातील आहे. या दोघांच्या कुटुंबातून अनेक काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. तपासकर्त्यांचं म्हणणं असंय की. सानिया शेखने कथितरित्या अल्ताफच्या 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक टाकलं. पीडित चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

मुलगा आयसीयुमध्ये दाखल 

काहीच तासानंतर लहान मुलाने उलटी केली होती, या घटनेनं चिमुकल्याची आई चिंतेत आहे. जेव्हा ती आपल्या मुलाजवळ गेली तेव्हा तिच्या मुलाचे दोन्ही ओठ एकमेकांना चिकटून बसले होते. महिलेनं या घटनेची तात्काळपणे आपल्या नवऱ्याला माहिती दिली होती. मुलाला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. 

हे ही वाचा : पीडितेनं केली लिफ्टची मागणी, चालत्या कारमध्ये तीन तास आळीपाळीने अत्याचार

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी सांगितलं की, दरम्यान लहान मुलाची प्रकृती सध्या चांगली असून ते बाळ बरं होतंय. तक्रारदाराच्या माहितीनुसार, सानियावर आरोप करण्यात आलाय की, जेव्हा झैनबने तिला या घटनेबाबत विचारले असता, तिने कोणालाही काहीही सांगू नये असे बजावले. जर कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील दिली होती.