Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम, तर 7 जिल्ह्यांचं काही खरं नाही

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी काही ठिकाणी दुहेरी वातावरण आहे. काही भागात हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला. तर काही ठिकाणी हवामान विभागाने कसलाही अलर्ट जारी केला नाही, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. जाणून घ्या 5 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उन्हाचा चटका कायम

point

तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी काही ठिकाणी दुहेरी वातावरण आहे. काही भागात हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला. तर काही ठिकाणी हवामान विभागाने कसलाही अलर्ट जारी केला नाही, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच काही ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला, जाणून घ्या 5 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

हे ही वाचा : सोलापूर : गाणगापूर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस–डंपरच्या धडकेत दोघांचा चिरडून दुर्दैवी अंत

कोकण 

कोकण विभागात हवामान विभागाने पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण-दमट वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. तर याच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाने माहिती दिली आहे. 

मध्य महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये देखील कोरडं वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच दुपारी अधिक उन्हाचा चटका बसणार आहे. नागरिकांनी उन्हापासून काळजी घ्यावी. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदूरबारमध्ये हवामान कोरडं राहील. तसेच या जिल्ह्यांना उन्हाचा चटका सहन करावा लागेल. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान कोरडं राहील असा अंदाज वर्तवला. तसेच याच ठिकाणी उष्णता कायम राहील, अशी शक्यता आहे. 

हे वाचलं का?