'मी तुझ्याकडे भीक मागतो...' निशांतने अपूर्वाला लिहलं पत्र अन् उचललं टोकाचं पाऊल, हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

Mumbai Crime News: निशांत यांनी पत्नी अपूर्वाला हे शेवटचं पत्र लिहिलंय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निशांतने आत्महत्या करण्याच्या 3 दिवस आधी हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती आणि आत्महत्येच्या दिवशी त्यानं बाहेर 'डू नॉट डिस्टर्ब' असा बोर्डही लावला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीच्या त्रासाला कंटाळला, पण म्हणाला प्रेम अजूनही आहे

point

हॉटेल रूम घेऊन स्वत:ला संपवलं, चिठ्ठीत सगळं सांगितलं

point

कविता लिहिली, माफी मागितली, म्हणाला आईकडे जाऊ नका...

Nishant Tripathi Suicide Case: मुंबईतील विलेपार्ले येथील सहारा हॉटेलमध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली असून, पुन्हा अतुल सुभाष आणि तत्सम प्रकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी आणि मावशीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून या व्यक्तिने हा निर्णय घेतला. निशांत त्रिपाठी असं मृताचं नाव असून, त्यानं गळफास घेण्यापूर्वी स्वतःच्या कंपनीच्या वेबसाइटवर त्याची सुसाईड नोट अपलोड केली होती.

हे ही वाचा >> Kolhapur : पत्नीसोबतचा वाद टोकाला, पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवून घेतलं, थरार कॅमेऱ्यात कैद

आत्महत्या करण्यापूर्वी कर्मचाऱ्यानं ही चिठ्ठी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केली, ज्यामधून संपूर्ण प्रकार समोर आला. "हे अपूर्वासाठी आहे, हाय बेबी.. तू हे वाचशील तेव्हा मी मेलेलो असेन.' माझ्या शेवटच्या क्षणी काहीही झालं तरी, मी तुझा द्वेष करू शकलो असतो पण या क्षणासाठी मी प्रेम निवडलं. मी आधीही तुझ्यावर प्रेम करत होतो, आताही तुझ्यावर प्रेम करतो. आणि मी वचन दिल्याप्रमाणे, हे प्रेम कधीही कमी होणार नाही. माझ्या आईला माहिती आहे की, मी ज्या सर्व त्रासाला तोंड दिलं आहे त्यात तू आणि प्रार्थना काकू माझ्या मृत्यूचं कारण आहात. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या आईकडे जाऊ नका, तिचं मन दुखावलं, तिला एकटीलाच दुःख सहन करू द्या...

निशांत यांनी पत्नी अपूर्वाला हे शेवटचं पत्र लिहिलंय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निशांतने आत्महत्या करण्याच्या 3 दिवस आधी हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती आणि आत्महत्येच्या दिवशी त्यानं बाहेर 'डू नॉट डिस्टर्ब' असा बोर्डही लावला होता.

पत्नी आणि तिच्या मावशीविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर निशांत त्रिपाठीच्या आईने मुंबईतील विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आत्महत्येनंतर, पोलिसांनी प्रथम एडीआर दाखल केला आणि नंतर, आईच्या तक्रारीवरून, निशांतची पत्नी अपूर्वा पारीक आणि त्याची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp