Manoj Jarange : ‘तो राष्ट्रपती झाला, तरी…”, जरांगेंनी भुजबळांना काय दिलं चॅलेंज?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना डिवचलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावरूनही जरांगेंनी खोचक सल्ला दिला.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. ही मागणी झाल्यानंतर राज्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहे. जरांगे पाटील पुन्हा दौरा करणार असून, त्याआधी त्यांनी भुजबळांना खुलं चॅलेंज दिलं आहे.
ADVERTISEMENT
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं.
भुजबळ यांनी माफी मागावी
छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर खुलासा करताना ते म्हणाले होते की, मी त्या गावाबद्दल बोललो होतो. भुजबळांच्या याच खुलाशावर जरांगे पाटील म्हणाले, “ते काहीही म्हणतं. त्याचे प्रश्नच विचार नका इथून पुढे. कामातून गेलंय ते. काहीच कळेना ते काय म्हणतंय ते.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘राहुल गांधींना शुभेच्छा’, जरांगे ‘त्या’ विधानावर काय बोलले?
“आमच्यात भांडण लावतोय. आमच्यात तर लागतच नाही, पण तो मंत्री आहे आणि आता त्याने केलाच आहे अपमान. कायद्याचा पदावर बसलेला आहे. तो त्याचाच समाज आहे. जर तू खरंच ओबीसींचा नेता असशील, तर त्या गोरगरिबांची माफी माग. तू जर माफी मागितली नाही, तर ओबीसी बांधव समजतील की तू जाणून बुजून बोललेला आहे. माफी मागितली नाही, तर तू मग्रूर आहे, असं सिद्ध होईल”, असं जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळांनी दिला राजीनामा, जरांगे म्हणाले…
छगन भुजबळांनी राजीनामा दिला आहे, पण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. याच मुद्द्यावर जरांगे म्हणाले, “दिलाच नसेल त्याने. तो काय लय शहाणा आहे का? त्याने दिला, नाही दिला; आम्हाला काहीच फरक पडत नाही. तू कुठेही रहा आरक्षण ओबीसीतूनच घेणार. तू राष्ट्रपती पण हो उद्या… तू म्हण सगळी पावर माझ्या हातात आली आहे, मराठ्यांना मिळू देत नाही. तरी तुला ओबीसीतून आरक्षण मिळवून दाखवतो.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला
राष्ट्रपती पदासाठी शुभेच्छा देणार का? असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर जरांगे म्हणाले, “आता तो ग्रामपंचायत सदस्य होतो की नाही. तो कधी राष्ट्रपती होणार? न्हावी बांधव त्याला सूचू देत नाहीयेत. त्याला म्हणावं तू आता तलाठी हो”, असा खोचक सल्ला जरांगे पाटलांनी भुजबळांना दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT