Manoj Jarange : ‘…तोपर्यंत आम्ही फाशी घ्यायची का?’, गिरीश महाजनांना जरांगेंचा संतप्त सवाल
Manoj Jarange patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी गिरीश महाजन यांनी कॉल केला. त्यांनी उपोषण न करण्याची विनंती केली मात्र, मनोज जरांगे पाटलांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात करण्यापूर्वी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना कॉल केला. अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषण करू नये, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केली, पण त्याला जरांगे पाटलांनी नकार दिला. मोबाईलवरून संभाषण करत असताना तोपर्यंत आम्ही का फाशी घ्यायची का? असा संतप्त सवाल जरांगे पाटलांनी महाजनांना केला.
गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना कॉल केला. त्यांना उपोषण न करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, “तुम्ही आलात. मी म्हणालो चार दिवस. तुम्ही म्हणालात की होणार नाही. कायदा टिकावा लागेल. मी तुमच्या शब्दाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान ठेवला. तुम्ही म्हणाले एक महिना वेळ हवा आम्ही 41 दिवस दिले. आमचं आयुष्य का उद्ध्वस्त करता?”
हे ही वाचा >> Maratha Reservation देणे खरंच शक्य आहे का? समजून घ्या निवृत्त न्यायमूर्तीकडून
गिरीश महाजन म्हणाले, “ते (आरक्षण) कायमस्वरुपी टिकण्यासाठी आम्ही कामच करतोय.” त्यावर जरांगे पाटील म्हणाले, “काम लय दिवसांपासून सुरु आहे. 40 वर्षांपासून तेच सुरू आहे. अभ्यास आणि समिती.”
आमचं काय चुकलं सांगा? जरांगे पाटलांचा सवाल
महाजन म्हणाले, “आता तसं नाहीये. तुमच्या रुपाने ते इतकं हातघाईवर आलेले आहे. ते करावंच लागणार आहे.” जरांगे पाटील म्हणाले, “मग करा. उद्या करा. परवा करा. मी आता आज बसलोय दादा. तुमचा सन्मान आम्ही ठेवलेला आहे. आमचा मराठा समाज काही चुकलेला नाही. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. काय चुकलं आमचं? याचं उत्तर द्या. आम्ही गरीब नाहीये का?”, असा प्रश्न जरांगे पाटलांनी महाजनांना केला.