Manoj Jarange : जरांगेंची प्रकृती कशी? डॉक्टर म्हणाले, “किडनी, लिव्हरला…’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Health update news
Manoj Jarange Patil Health update news
social share
google news

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी सुरु केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी थांबवलं. दोन महिन्यात मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर जरांगेंनी हा निर्णय घेतला. गेल्या 9 दिवसांपासून मनोज जरांगे हे अन्नाशिवाय उपोषण करत होते. मध्ये काही दिवस त्यांनी पाणीही घेतलं नव्हतं. याचे परिणाम त्याच्या शरीरावर झाले आहेत. याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिलीये.

ADVERTISEMENT

25 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी गावात पुन्हा उपोषण सुरू केले होते. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता. मात्र, नंतर जरांगेंची प्रकृती ढासळल्यानंतर आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या. आंदोलकांना शांत करण्यासाठी जरांगे पाटलांनी घेतलं होतं. त्याचबरोबर इतर नेत्यांनी भेट घेतली तेव्हाही ते पाणी प्यायले होते. मात्र, पुरेसं अन्न आणि पाणी न घेतल्याने त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे.

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीवर काय झाला परिणाम?

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. त्यांची प्रकृती चांगली नसल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येत असून, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीतबद्दल माहिती दिली.

हे ही वाचा >> Manoj Jarange : CM शिंदे म्हणाले, ‘सरसकट नाही’, जरांगेंनी गोंधळ केला दूर

डॉक्टर म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांची तब्येत चिंताजनक होती. काल (2 नोव्हेंबर) भरती झाले, तेव्हा त्यांचा बीपी, शुगर कमी झालेलं होतं. अशक्तपणाही खूप होता. त्यांच्या रक्त चाचण्या आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये असे आढळून आले की, त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आहे.”

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Elvish Yadav : रेव्ह पार्टीचा बेत, 5 कोब्रा अन् विष; Bigg Boss विजेता एल्विशवर गुन्हा

“नऊ दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या किडनी आणि लिव्हरला इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला त्यांची प्रकृती प्रतिसाद देत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला अजून पाच ते सहा दिवस लागतील”, अशी माहिती डॉक्टरांनी जरांगेंच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT