Manoj Jarange : शिंदे सरकारला जरांगेंचा स्पष्ट ‘मेसेज’; म्हणाले “देव सुद्धा मराठ्यांना…”
Manoj Jarange todays speech : शिंदे सरकारचे प्रतिनिधी गिरीश महाजन, संदिपान भुमरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारसमोर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

-इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर
Manoj Jarange Patil Maratha Reservation Antarwali Sarathi : शिंदे सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाशी संवाद करताना जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला स्पष्ट मेसेज दिला. यावेळी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानाचा उल्लेखही जरांगेंनी बैठकीत केला.
अंतरवाली सराटी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “आपल्याला फरक करून लढायचं आहे. तरच आपली शक्ती वाढणार आहे. समोरचा विरोध करतोय म्हणून आपण विरोध करायचा नाही. आपण ओबीसी आरक्षण कसं जाणार, हे बघायचं आहे. आठमुठं कोण आहेत? मराठे आहेत की, आरक्षणात येऊ नका म्हणणारे आहेत? आपल्याला फरक करून लढलो तर आपली शक्ती वाढणार आहे”, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले.
ओबीसीमध्ये येऊ नका असं कसं म्हणता?
“काल गिरीश महाजन यांनी माहिती दिली. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. मराठ्यांच्या जर 54 लाख नोंदी मिळाल्या, तर याचा अर्थ मराठा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता?”, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.