Maratha Reservation : उपसमितीच्या बैठकीत काय झालं? CM शिंदे दिली माहिती

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

cm eknath shinde press conference after maratha Reservation sub cabinet committee meeting.
cm eknath shinde press conference after maratha Reservation sub cabinet committee meeting.
social share
google news

CM Ekanth Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. तर मराठा समाजही आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडली. या बैठकीत काय चर्चा आणि निर्णय घेतले गेले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण, इतर आंदोलनं यापार्श्वभूमीवर उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला मीही होतो. या बैठकीत तपशीलवार चर्चा केली. त्यामध्ये न्यायमूर्ती शिंदेंची जी समिती स्थापन केली आहे. जुन्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी, त्या समितीने प्रथम अहवाल सादर केला आहे. तो अहवाल उद्या कॅबिनेट बैठकीत स्वीकारला जाईल आणि पुढील प्रक्रिया केली जाईल.”

हे ही वाचा >> ‘मी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि…”, शरद पवारांनी बोलून दाखवली भीती

किती कुणबी नोंदी आढळून आल्या?

“१ कोटी ७२ लाख कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात ११ हजार ५३० जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांनी सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यात काही रेकॉर्ड ऊर्दू आणि मोडी लिपीमध्ये सापडले आहेत. त्यांनी हैदराबादमधील प्रशासनाला जुन्या कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे”, असे शिंदे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘मी विष पिऊन मरते, पण जरांगेचा….’, मराठा आंदोलक महिला हंबरडा फोडत काय म्हणाली?

कागदपत्रांची तपासणी करून पुढील कार्यवाही

“त्यांनी सर्व कागदपत्रे तपासली आहे. त्यांनी सविस्तर तपासणी केली आहे. सरकारने त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे, तरी सरकारने त्यांना लवकरात लवकर अंतिम रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. १ कोटी ७३ कोटी कागदपत्रे तपासली. त्यात ११ हजार नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करून पुढील कार्यवाही सुरू केली जाईल”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT