Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पाणीही सोडलं; डॉक्टर आले, पण…
Maratha Reservation kunbi caste certificate : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला.
ADVERTISEMENT

– इसरार चिश्ती, आंतरवली सराटी
Maratha Reservation in Maharashtra Latest News : मराठा जातीला कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा 14 वा दिवस असून, अद्यापही पेच फसलेलाच आहे. सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सोडले आहे. इतकंच नाही, तर त्यांनी उपचार घ्यायलाही नकार दिला आहे.
मराठा जातीला आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा जातीला कुणबी जातीचे दाखले देण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारने निजामकाळात ज्यांच्या वंशावळीवर मराठा-कुणबी, कुणबी मराठा असा उल्लेख आहे. त्यांनाच कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >> Maratha Reservation : जीआर निघाला! मनोज जरांगे पाटलांना जे नको होतं, तेच झालं!
मनोज जरांगे पाटील यांनी याला विरोध केला आहे. सरकारने मराठा जातीतील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीये. त्यावर निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पाण्याचाही त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.










