Jay Malokar: मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू 'यामुळे', हादरवून टाकणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट
Jay Malokar Death Case: अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले आहे. जयचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसल्याचं आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड दरम्यान राड्यात झालेला मनसैनिकाचा मृत्यू
मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
धनंजय साबळे, अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर 30 जुलै अकोल्यात मनसे नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी मिटकरींच्या कारची तोडफोड करणाऱ्यांमधील आरोपी आणि मनसैनिक जय मालोकार याचा मृत्यू झाला होता. जय मालोकार याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं आतापर्यंत सांगण्यात येत होते. मात्र आज (18 सप्टेंबर) समोर आलेल्या शवविच्छेदन अहवालातून (Postmortem Report)प्रचंड धक्कादायक खुलासा झाला आहे. (mns jay malokar who smashed mla amol mitkari car did not die of a heart attack shocking post mortem report)
ADVERTISEMENT
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
अकोला मनसे कार्यकर्ते जय मालोकर याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. गंभीर दुखापत झाल्याने जयचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 30 जुलै रोजी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. यादरम्यान राज ठाकरेंवर भाष्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली होती. या घटनेनंतर त्याच दिवशी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकर याचा मृत्यू झाला होता. पण त्यावेळी मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात होते.
हे ही वाचा>> Pune News: पुण्यात कामाच्या ताणामुळे CA तरुणीचा मृत्यू! संतापलेल्या आईचं पत्र व्हायरल
परभणीतील होमिओपॅथीच्या तृतीय वर्षाला असलेल्या जयच्या मृत्यूबाबत मनसेने मिटकरी यांच्याशी झालेल्या तणावपूर्ण वादातून हा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. जयच्या मृत्यूनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. जयच्या मृत्यूपूर्वी तीन तासांत काय घडले याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जयच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हे वाचलं का?
कुटुंबाने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. जयच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.
हे ही वाचा>> Kadambari Jethwani: कोण आहे कादंबरी जेठवानी? जिच्यामुळे 3 IPS आले गोत्यात... झालं थेट निलंबन!
जय मालोकरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील ठळक मुद्दे
- जयला जबर मारहाण करण्यात आली. त्याच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर खोल जखमांच्या खुणा आहेत.
- त्याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने तुटलेल्या आढळल्या.
- डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे मेंदूला सूज आली आणि त्याचे वजन वाढले.
- मानेला मार लागल्याने मज्जातंतूंना गंभीर इजा झाली.
- शेवटी 'न्यूरोजेनिक शॉक'मुळे त्याचा मृत्यू झाला
नेमकं प्रकरण काय?
पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा करत पूरस्थितीचा आढावा घेतला होता. ज्यावरून राज ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. ज्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना 'सुपारीबाज' असं म्हटलं होतं. ज्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले होते. 30 जुलैला अमोल मिटकरी हे अकोल्यात आले होते. त्यावेळी मनसैनिकांनी त्यांच्या गाडीची तुफान तोडफोड केली होती. पण त्यानंतर मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT