Nashik: ‘काम असेल तर माझ्याकडे येता, आणि मतदान…’, राज ठाकरे शेतकऱ्यांना असं का म्हणाले?
Raj Thackeray and Farmer: नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. मात्र, यावेळी राज ठाकरे यांनी जे विधान केलं त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT

Raj Thackeray Nashik: प्रविण ठाकरे, नाशिक: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या दोन दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांची काही शेतकऱ्यांनी खास भेट घेतली. यावेळी शेतकरी जिल्हा बँक आणि शेतमालाला मिळणाऱ्या हमीभावाविषयी संबंधित विषयावर राज ठाकरे यांच्याशी बोलत होते. मात्र, त्याचवेळी राज ठाकरे यांनी जे भाष्य केलं त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (mns president raj thackeray taunted farmers of nashik over voting)
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातील एक शेतकरी जेव्हा आपलं गाऱ्हाणं राज ठाकरेंसमोर मांडत होता. तेव्हाच राज ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले की, ‘मागे एकदा शेतकऱ्यांनी संप केला होता.. हे आठवतंय? त्यावेळेस काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. 20-25 जणं होते. त्यांना मी सांगितलं की, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता.. आणि मतदानाच्या वेळेला त्या लोकांना मतदान करता. तर त्यांनी सांगितलं की, साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं.’
‘म्हणजे जे तुम्हाला मदत करत नाहीत. त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे का येता?’ असा सवालच राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना यावेळी विचारत.. एकप्रकारे मनसेला न होणाऱ्या मतदानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
‘…त्यांना मतदान केलं तर या चाबकानेच मारीने’
दरम्यान, याचवेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना सरकारविरोधात आपली नाराजी जाहीर करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात एक आसूड (चाबूक) राज ठाकरेंना भेट दिला. त्यावेळी राज ठाकरे तात्काळ मिश्किलपणे म्हणाले की, पुन्हा त्यांना मतदान केलं तर या चाबकाने मारेन.’