मुंबईत घातपात घडवण्याचा कट; बोरिवलीतून 6 जणांना अटक, ‘हे’ आरोपी आहेत तरी कोण?
मुंबईच्या बोरीवली पूर्वेतील एलोरा गेस्ट हाऊसमध्ये काही दहशतवादी शस्त्रसाठ्यासह असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एटीएसने रविवारी दुपारी अचानक गेस्ट हाऊसवर छापा टाकला होता.
ADVERTISEMENT
Mumbai Ats Team raid In Borivali : दिपेश त्रिपाठी, मुंबई : मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने (ATS)ने रविवारी घातपाताचा मोठा कट उधळला आहे.बोरीवली पुर्वेतील ऐलोरा गेस्ट हाऊसमध्ये एटीएसने छापा टाकून 6 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 3 पिस्तूल, 29 काडतुसे, एक चाकू, एक स्कॉर्पिओ गाडी आणि दरोड्यासाठी लागणाऱ्या वस्तू जप्त केल्या आहेत.मुंबई एटीएसच्या या कारवाईने दहशतवाद्यांच्या मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे. या घटनेनंतर आता या आरोपींनी बोरीवलीत ही जिवंत काडतूस का आणली होती. जिवंत काडतूस मुंबई आणण्या मागचा नेमका कट काय होता? याचा तपास एटीएसने सुरु केला आहे. (mumbai ats team raid in borivali guest house 6 people arrested and cache arms ammunition)
ADVERTISEMENT
मुंबईच्या बोरीवली पूर्वेतील एलोरा गेस्ट हाऊसमध्ये काही दहशतवादी शस्त्रसाठ्यासह असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एटीएसने रविवारी दुपारी अचानक गेस्ट हाऊसवर छापा टाकला. या छाप्यात एटीएसने 6 आरोपींना अटक केली आहे. यासह आरोपींकडून 3 पिस्तूल, 29 काडतुसे, एक चाकू, एक स्कॉर्पिओ गाडी आणि दरोड्यासाठी लागणाऱ्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. एटीएसने ताब्यात असलेले हे सहाही आरोपी दिल्लीवरून मुंबईला आले होते.या आरोपींची आता चौकशी सुरु आहे.
हे ही वाचा : ‘अजित पवारांच्या पोटातलं ओठात आलं’, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा पलटवार
कोण आहेत आरोपी?
एटीएसने अटक केलेल्या या सहाही आरोपींची आता नावे समोर आली आहेत. शहादत हुसेन उर्फ कल्लू रहमत हुसेन असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीतील जामा मशिदचा रहिवासी आहे.शहादतवर हत्येचा आरोप असून तो नुकताच शिक्षा भोगून तुरूंगातून बाहेर आला होता. अस्लम शब्बीर अली खान असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे, तो दिल्लीचा रहिवासी आहे. शब्बीर अली खानलाही यापूर्वी खून आणि चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.नदीम युनूस अन्सारी नदीम हा देखील जामा मशीद, दिल्लीचा रहिवासी आहे. नदीमवर दिल्लीत अनेक गुन्हे दाखल आहेत.नौशाद अन्वर हा उत्तर प्रदेशातील बुलंद शहरचा रहिवासी आहे. नौशाद अन्वर हा मुंबईत रेकी करण्यासाठी आला आहे. आदिल खान हा चौकी गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, हे लोक ज्या गुन्ह्यात सहभागी होणार होते त्यामध्ये आपला सहभाग असावा म्हणून आदिल खानने पोलिसांनी जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी आणली होती
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ajit Pawar : ‘आम्ही कुठे चुकलो…, अजितदादांचा शरद पवारांवर हल्ला
मुंबई मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले आहेत किंवा शस्त्रसाठा पुरवण्यासाठी हे आरोपी मुंबईत आल्याची प्राथमिक माहिती आहे. या आरोपींचा मुंबईत येऊन घातपाताचा नेमका कोणता कट होता, हे अद्याप कळु शकले नाही आहे. तसेच मुंबईत येऊन आरोपी कुणाला शस्त्रसाठा पुरवणार होते. या सर्व गोष्टीचा तपास सध्या मुंबईची एटीएस टीम आणि कस्तुरबा पोलीस करीत आहे.
या सहाही आरोपींवर मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दरोड्याचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT