मुंबईची खबर : गणपती विसर्जनाला मेट्रो-3 रात्रभर सुरु राहणार? काय आहे निर्णय?

मुंबई तक

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोने एक महत्त्वाची निर्णय घेतला आहे. तो निर्णय नेमका काय आहे, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गणपती विसर्जनाला मेट्रो-3 रात्रभर सुरु राहणार?

point

काय आहे निर्णय?

Mumbai News : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेल्या मुंबईकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याने, भाविकांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो लाइन 3 रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाइन 3 ने आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली असून, या विशेष सेवेमुळे नागरिकांना रात्रभर सहज आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये मेट्रोने काय म्हटलं?

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मेट्रोने म्हटलं आहे की, 'अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी मुंबई मेट्रो लाईन 3 (Aqua Line) ची सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. गणपती बाप्पाच्या निरोपासाठी जाणाऱ्या भाविकांना या विशेष सेवेचा लाभ घेता येईल.'

हे ही वाचा : दुष्काळावरील चर्चेसाठी अधिवेशन बोलवा, 'त्या' 31 हजार कोटींचा हिशोब द्या; ठाकरेंचे सरकारला बेधडक सवाल

नागरिकांना मिळणार दिलासा

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि इतर नामांकित सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जन मिरवणुका रात्रभर चालतात. या कालावधीत शहरात प्रचंड गर्दी होत असल्याने खासगी वाहनांनी प्रवास करणे आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे कठीण होते. अशा परिस्थितीत रात्रभर सुरू राहणाऱ्या मेट्रो सेवेमुळे भक्तांची मोठी सोय होणार आहे. यापूर्वीही गणेशोत्सवादरम्यान प्रमुख मंडळांना आणि देखाव्यांना भेटी देणाऱ्या भाविकांसाठी मुंबईतील मेट्रो सेवांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या, मात्र विसर्जनच्या दिवशी रात्रभर चालणाऱ्या सेवेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : 'दुष्काळी दौरे काजू, बदाम खाण्यासाठी आहेत का?' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात, नेमकं काय म्हणाले?

गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी

दुसरीकडे, शुक्रवारी होणाऱ्या या विसर्जनासाठी मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळांवर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. मुंबईतील सर्वात मोठे आणि मुख्य विसर्जन स्थळ मानल्या जाणाऱ्या गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौपाटीवर नियंत्रण कक्ष, आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्रे, तात्पुरते तंबू, सुरक्षा बूथ आणि प्रकाश व्यवस्था उभारण्यात आली असून, गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.