Mumbai : देशातील पहिली ‘डबल-डेकर’ मुंबईत धावली! कोणत्या काळात झाली होती सुरू?

रोहिणी ठोंबरे

आता मुंबईच्या रस्त्यावरून डबल-डेकर बस गायब होतील. एकेकाळी मुंबईची ओळख म्हणून या डबल-डेकर बसेसकडे पाहिलं जायचं. ब्रिटीश काळापासून धावणाऱ्या या बसेस आता धावणार नाहीत.

ADVERTISEMENT

Now double-decker buses will disappear from Mumbai's roads. Once upon a time, these double-decker buses were seen as the identity of Mumbai.
Now double-decker buses will disappear from Mumbai's roads. Once upon a time, these double-decker buses were seen as the identity of Mumbai.
social share
google news

Mumbai Double Decker Bus : आता मुंबईच्या रस्त्यावरून डबल-डेकर बस गायब होतील. एकेकाळी मुंबईची ओळख म्हणून या डबल-डेकर बसेसकडे पाहिलं जायचं. ब्रिटीश काळापासून धावणाऱ्या या बसेस आता धावणार नाहीत. डिझेलवर चालणाऱ्या या डबल-डेकर बसेस आजपासून (१५ सप्टेंबर) मुंबईत पूर्णपणे बंद झाल्या आहेत. या बसेस चालवण्याचे काम बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टद्वारे (बेस्ट) पाहिले जात होते. (Mumbai’s Double Decker Buses off On roads From 15 september)

बेस्टच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या मुंबईत फक्त सात डबल-डेकर बस आहेत, त्यापैकी तीन ओपन-डेक बस आहेत. 15 सप्टेंबरपासून डबल डेकर बसेस रस्त्यावरून हटवण्यात येतील आणि 5 ऑक्टोबरपासून ओपन-डेक बसेस बंद होतील.’

या बस बंद केल्या जात आहेत कारण त्या बस डिझेलवर चालतात. डिझेल वाहनांचे आयुष्य 15 वर्षे आहे. या सात बसेसला 15 वर्षे पूर्ण होत असल्याने आता त्या काढण्यात येत आहेत.

Maratha Reservation : रात्री 12 ते पहाटे 3; मनोज जरांगेंनी उपोषण सोडण्यापूर्वी रात्रभर काय घडलं?

86 वर्षांपासून सुरू होता डबल-डेकरचा प्रवास!

मुंबईची ओळख बनलेल्या डबल-डेकर बस 86 वर्षांपासून रस्त्यावर धावत होत्या. 1937 मध्ये ब्रिटिशांनी मुंबईत पहिली डबल-डेकर बस चालवली. तेव्हापासून ते वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp