Nashik News : काळाराम मंदिराबद्दल वादग्रस्त पत्रक छापणारा सापडला; कोण आरोपी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nashik kalaram temple postering one accuse arrested devendra fadnavis reaction
आक्षेपार्ह पत्रक छापून वाटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
social share
google news

Nashik News : नाशिकमधील काळाराम मंदिराच्या परिसरात आक्षेपार्ह पत्रक छापून वाटण्यात आल्याची घटना घडली होती. या पत्रकात काळाराम मंदिर आणि परिसरात काही विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचे म्हटले होते. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. नाशिकच्या पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणात आक्षेपार्ह पत्रक छापून वाटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमोल सोनवण असे या आरोपीचे नाव आहे. या  आरोपीचा आता तपास पोलीस करीत आहेत. (nashik kalaram temple postering one accuse arrested devendra fadnavis reaction)

नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात हिंदु युवा वाहिनीच्या नावे काही वादग्रस्त पत्रके वाटण्यात आली होती. या पत्रकात काळाराम मंदिर आणि परिसरात काही विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करून अमोल चंद्रकांत सोनवणे याला अटक केली आहे. अमोल सोनवणे हा अनुसुचित जाती या प्रवर्गातील असल्याने वर नमुद गुन्ह्याला अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम मधील कलमे लागु होत नाहीत. तरीही आरोपीला गुन्ह्यातील अन्य कलमान्वये अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Vidhan sabha : भाजप लढवणार 170 जागा? अजित पवार, शिंदेंना किती?

पोलीस चौकशीत दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या वैमनस्यातून त्याने हे पत्रक काढल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या पत्रकामागील अन्य कारणांचा शोध घेत आहेत. या मागे अन्य कोणी आहे का, दंगल घडविण्यासाठी असे पत्रक काढले का, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

दरम्यान माध्यमांशी नाशिकमधील प्रकाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढलेली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले आहे. हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधले जात आहे. आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले आहे. त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे. 

हे ही वाचा : Murlidhar Mohol : "मुंडे साहेबांना आज खूप आनंद झाला असता", मोहोळ झाले भावूक

    follow whatsapp

    ADVERTISEMENT