पहलगाम हल्ल्याचा दुसरा Video आला समोर, पाहा नराधमांनी कसा केला पयर्टकांवर हल्ला!
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नवीन व्हिडीओ आला समोर

पहलगाम हल्ल्याच्या नवीन व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय?

दहशतवादी हल्ल्याच्या हल्लेखोरांवर काय कारवाई केली?
Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ 22 एप्रिलचा असल्याचं सांगितलं जात आहे.या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना दिसत आहेत. गोळी लागताच, पांढऱ्या शर्ट घातलेला माणूस जमिनीवर पडतो आणि आरडाओरडा सुरू होतो.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आला आहे. दहशतवाद्याने प्रथम एका पर्यटकावर गोळीबार केला. त्यानंतर पूर्ण मैदानात गोळीबाराचा आवाज येऊ लागतो. व्हिडीओमध्ये दहशतवादी एकामागोमाग एका गोळ्या झाडताना दिसत आहेत. जंगलात लपून बसलेले दहशतवादी नंतर बाहेर येऊन पर्यटकांवर गोळीबार करत हल्ला करतात.
गोळीबार सुरू होताच सर्वत्र गोंधळ आणि आरडाओरड सुरू होते. यातून लोक स्वतःला वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करतात. दहशतवादी अगदी निवडक पद्धतीने पर्यटकांना गोळी घालून त्यांना मारतात. घटनास्थळी पर्यटकांच्या जेवणाचा डबा आणि खाद्यपदार्थ विखुरलेले दिसत आहेत.
हे ही वाचा: इन्स्टाग्रामवर प्रेम, पतीची अडचण! पत्नी आणि प्रियकरानं मिळून काटा काढला, पण एका चुकीमुळे पकडे गेले