नव्या संसदेत पहिलेच भाषण, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नवीन संकल्प….’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत पहिल्याच भाषणात अनेक गोष्टींना आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी यावेळी लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्पर्शाने सेंगोल देशाच्या संसदेला मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
PM Narendra Modi : भारताच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पहिले भाषण झाले. नरेंद्र मोदी यांनी संसदेतील पहिल्याच भाषणावेळी महिला आरक्षणाविषयी (Women reservation) महत्वाची भूमिका मांडत त्यांनी नव्या संसदेचं महत्त्व देशाला सांगितले. नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी लोकमान्य टिळकांची आठवण काढत पंडित जवाहरलाल नेहरूंचा (Pandit Jawaharlal Nehru) ज्या सेंगोलला स्पर्श झाला आहे. तो सेंगोल आज देशाच्या लोकशाहीला बळ देत असल्याची भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या भाषणात अनेक गोष्टींना स्पर्श करत महिला विधेयकामुळे देशात नवी क्रांती घडणार असल्याचे सांगत महिलांना बळ मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.(first speech new parliament pm modi said new resolution)
ADVERTISEMENT
नव्या संसदेत सर्व काही नवं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत आपले पहिले भाषण करताना संसदेचं महत्व विशद करत त्यांनी संसद नवी असले तरी इतिहास कायम तोच असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केली. आज नव्या संसदेत प्रवेश करताना, आणि काम करताना नेहमीच याचा आदर राहिल. त्याचबरोबर ही संसद आपल्यासाठी नवीन आहे. त्यामुळे नव्या संसदेत आपले भाव आणि भावनाही आता नव्या असायला हव्यात अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा >> नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा, जाणून घ्या ‘या’ भवनाची 5 वैशिष्ट्ये
पंडित नेहरू आणि वारसा
स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही स्थापन झाल्यानंतर या देशाला पंडित जवाहरलाल नेहरूंचा वारसा लाभला आहे. त्याच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून आणि त्यांचा स्पर्श झालेला सेंगोल आज आम्हाला प्रेरणा देत आहे. त्यामुळे आपल्या या नव्या संसदेत येत असलो तरी हा वारसा आपल्याला मिळाला आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे वाचलं का?
भूतकाळाला विसरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत पहिलं भाषण देताना त्यांनी सांगितले की, ही संसद नवी आहे. त्यामुळे सारं काही नवं आहे. संसद नवी असल्यामुळेच आता भाव आणि भावनाही नव्या असायला हव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. नव्या संसदेत प्रथम आणि ऐतिहासिक सत्रात बोलताना त्यांनी देश आता नव्या संकल्पानांसह नव्या संसदेत दाखल झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भूतकाळाला विसरु आणि देशासाठी ऐतिहासिक कार्य करण्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
हे ही वाचा >> Aditya-L1 Mission: गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्ताला आदित्य L1 ने दिली खुशखबर, महत्वाचा टप्पा पूर्ण
देशातील स्त्री शक्तीसाठी नवा निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून महिला विधेयकावर वाद झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला विधेयक मांडून महिला सशक्तीकरणाला पाठबळ आणि महिलांना नेतृत्वाची संधी मिळत आहे. या विधेयकामुळे देशातील स्त्रियांच्या विकासाला मोठं पाठबळ मिळणार आहे. त्याच बरोबर महिला सक्षमीकरणात भारताची घोडदौड होत राहणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT