Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा तिसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचा 'खेळ'? Inside Story

मुंबई तक

Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांनी युपीएससीसाठी पात्र ठरण्यासाठी दृष्टीदोष आणि मानसिकरिकरित्या आजारी असल्याची प्रमाणपत्र आधीच सादर केली होती. या प्रमाणपत्रानंतर देखील पूजा खेडकर यांनी तिसरं लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पूजा खेडकर यांनी तिसरं अपंगत्व प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता.
pooja khedkar trainee ias try to attempt third disablity certificate what doctor says inside story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसरं अपंगत्व प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता.

point

लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता.

point

औंध हॉस्पिटलमध्ये अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.

Pooja Khedkar Case Update : ओंकार वाबळे, पूणे :  प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात नवीन नवीन खुलास्यांची मालिका सुरुच झाली आहे. ही मालिका संपण्याचं नावच घेत नाहीयेत. त्यात आता या प्रकरणात पूजा खेडकर यांनी तिसरं दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मात्र डॉक्टरांनी तो हाणून पाडला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र का नाकारलं होतं? हे जाणून घेऊयात. (pooja khedkar trainee ias try to attempt third disablity certificate what doctor says inside story) 

पूजा खेडकर यांनी युपीएससीसाठी पात्र ठरण्यासाठी दृष्टीदोष आणि मानसिकरिकरित्या आजारी असल्याची प्रमाणपत्र आधीच सादर केली होती. या प्रमाणपत्रानंतर देखील पूजा खेडकर यांनी तिसरं लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.मात्र पूजा खेडकर यांचा हा प्रयत्न फसला होता.   

हे ही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले

त्याचं झालं असं की, पूजा खेडकर यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पुण्यातील औंध हॉस्पिटलमधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता, सुत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे. या अर्जानंतर पूजा खेडकर यांची चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी केल्यानंतर पूजा खेडकर यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. डॉक्टरांनी 'दिव्यांग  प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचे'' म्हणत पूजा खेडकर यांचा अर्ज फेटाळून लावला होता,अशी सुत्रांची माहिती आहे. 

दरम्यान लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र म्हणजे सेरेब्रल पाल्सीच्या कोणत्याही स्वरूपाचा किंवा हाडे, सांधे किंवा स्नायूंची स्थिती जी अवयवांच्या हालचालींवर लक्षणीय प्रतिबंध करते.

हे वाचलं का?

    follow whatsapp