Kerala High Court : पॉर्न पाहणे गुन्हा नाही पण…’या’ चुकांमुळे होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pornography laws in india know full details kerala high court porn verdict
pornography laws in india know full details kerala high court porn verdict
social share
google news

Kerala high court porn verdict : पॉर्न पाहणे तसे कायद्याने गुन्हा नाही आहे. पण याबाबत आता केरल हायकोर्टाने एक मोठा निर्णय़ घेतला आहे. पॉर्न हा हा एकट्यात पाहणे कायद्याने गुन्हा नाही आहे. पण जर तुम्ही तो दुसऱ्याने दाखवत असाल तर तो कायद्याने गुन्हा ठरत असल्याचे केरळ हायकोर्टाने म्हटले आहे. केरळ हायकोर्टाचे जस्टीस पीवी कुन्हीकृष्णन खंडपीठाने हा निर्णय घेतलाय. जर एखादी व्यक्ती खाजगीत अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाहत असेल तर आयपीसी कलम 292 अंतर्गत तो अपराध नाही आहे. पण जर तो व्यक्ती अश्वील फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कलम 292 अंतर्गत गुन्हा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. (pornography laws in india know full details kerala high court porn verdict)

कोर्टाचा नेमका निर्णय काय?

‘पोर्नोग्राफी ही शतकांपासून प्रचलित आहे. आजच्या डिजिटल युगात तर ती अधिक सुलभ झाली आहे. अगदी इतकी सुलभ आहे की ती मुलांच्या आणि प्रौढांच्या हाताच्या बोटावर उपलब्ध आहे. जर एखादा व्यक्ती त्याच्या खाजगी वेळेत इतरांना पॉर्न न दाखवता पाहत असेल, तर तो गुन्हा आहे की नाही? खरं तर कोर्ट याला गुन्ह्याच्या कक्षेत आणू शकत नाही. कारण ती त्या व्यक्तीची वैयक्तिक निवड असू शकते आणि त्यात हस्तक्षेप करणे त्याच्या गोपनीयतेत घुसखोरी करण्यासारखे आहे, असे न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे काय?

खाजगी जागेत पॉर्न पाहणे चुकीचे नाही. खासगी खोलीत पॉर्न पाहणे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारात येऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये एका निकालात म्हटले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : KL Rahul मुंबईतील ‘या’ 4BHK साठी किती मोजतो भाडं?

पोर्नोग्राफीबाबत कायदा काय?

अश्लील व्हिडिओ, फोटो पाहणे, डाऊनलोड करणे आणि त्यांना सोशल मीडियावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास आयटी अॅक्ट अंतर्गत 67, 67A,67B तुरुंगवास अथवा दंडाची शिक्षा होऊ शकते.

कलम 67 : पॉर्न कटेंट पाहणे, डाऊनलोड करणे आणि व्हायरल केल्यास पहिल्यांदा 3 वर्षाचा तुरूंगवास आणि 5 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांदा 5 वर्षाचा तुरूंगवास आणि 10 लाखाचा दंड ठोठावला जातो.

ADVERTISEMENT

कलम 67A : मोबाईलमध्ये पॉर्न कटेंट बाळगणे आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पहिल्यांदा 5 वर्षाचा तुरूंगवास आणि 10 लाखाचा दंड ठोठावला जातो.दुसऱ्यांदा जर पकडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखाचा दंड होऊ शकतो.

ADVERTISEMENT

कलम 67B : जर एखाद्याच्या फोनमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफी अंतर्गत एखादा व्हिडिओ अथवा फोटो मिळाल्यास, पहिल्यांदा अटक झाल्यास 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 लाखाचा दंड ठोठावला जातो. आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखाचा दंड होऊ शकतो.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…तरचं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार’, विनोद पाटलांनी काढला तोडगा

IPC त ‘या’ शिक्षेची तरतूद

पोर्नोग्राफी आणि अश्लीलतेवरून भारतीय दंड संहितेत शिक्षेची तरतूद आहे. आयपीसीच्या कलम 292 आणि 293 मध्ये शिक्षेची तरतूद आहे.

कलम 292 : अश्लील वस्तुची व्रिक्री, प्रदर्शन किंवा प्रसारण करणे गुन्हा आहे. जर असे करताना एखाद्यास अटक झाल्यास 2 वर्षाचा तुरूंगवास आणि 2 हजाराचा दंड ठोठावला जाऊ शकतो. जर दुसऱ्यांदा अटक झाल्यास 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 हजाराचा दंड ठोठावला जातो.

कलम 293 : 20 वर्षाहुन लहान व्यक्तीला अश्लील वस्तु दाखवणे, विक्री करणे आणि भाड्यावर देणे किंवा प्रदर्शित करणे गुन्हा आहे. जर अशा प्रकरणात पहिल्यांदा अटक झाल्यास 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 हजार रूपयांचा दंड ठोठावला जातो. जर दुसऱ्यांदा अटक झाल्यास 7 वर्षाचा तुरूंगवास आणि 5 हजार रूपयाचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

चाईल्ड पोर्नोग्राफीवर कठोर कायदा

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंस (POCSO) अंतर्गत चाईल्ड पोर्नोग्राफीवर कठोर कायदा आहे. कलम 14 नुसार कोणतीही व्यक्ती लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी वापर करत असेल तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासोबतच दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.

पॉक्सो अॅक्ट अतर्गत कलम 15 नुसार, जर एखादा व्यक्ती चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधित कटेंट त्याच्या जवळ बाळगत असेल तर त्याला 3 वर्षाचा तुरूंगवास आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT