Manoj Jarange: मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत, मनोज जरांगेंचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं..

मुंबई तक

ADVERTISEMENT

public meeting in beed for reservation of maratha community manoj jarange speech as it is
public meeting in beed for reservation of maratha community manoj jarange speech as it is
social share
google news

Manoj Jarange Speech: बीड: मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मनोज जरांगे यांनी बीडमधील इशारा सभेत आपल्या खास शैलीत पण रोखठोक असं भाषण केलं. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीकेची झोड तर उठवलीच पण याशिवाय सरकारचाही खरपूस समाचार घेतला. याच सभेतील जरांगेंच भाषण वाचा जसंच्या तसं (public meeting in beed for reservation of maratha community manoj jarange speech as it is)

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Chhagan Bhujbal: ‘डबडं.. येडपट, रंग्या.. गप्प मरायचं ना’, भुजबळांना बोलताना जरांगेंनी सोडली पातळी

Maratha Reservation Beed: मनोज जरांगेंचं भाषण जसंच्या तसं ‘

मराठ्याचा हा महाप्रलय पाहून येवल्याच्या येडपटाला संडासला लागल्याशिवाय राहत नाही.. अशा खालच्या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केली टीका

कोणी म्हणतं आमची घरं जाळली, हॉटेल जाळली.. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप मराठे गुंतवले. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर केलं असतं की नसतं? मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकार झोपू नका.. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. विनाकारण त्याला डाग लावू नका..

ते कधी जाळपोळ करू शकत नाही.. यांची यांनीच जाळपोळ केली रे.. उगाच आमच्या गोरगरिबांची नावं घेतली. ते येवल्याचं येडपट.. बावचाळलेलं, त्याच्या पाव्हण्याचं हॉटेल त्यानीच जाळले आणि नावं आमच्या पोरांचं घेतंय. त्याचंच ऐकतंय सरकार हे..

तो तर सांगतो बघा-बघा मला कशा शिव्या देतात.. कशाला बोलतो रे मग? कशाला मराठ्यांचा वाटेला जातो.. काही दिवसांनी तुटलेल्या चपला, केळ्याची सालं तुझ्याजवळच दिसणार.. तू थांब थोडं.. तुला म्हटलं होतं माझ्या नादी लागू नको.. मी लय नमुना बेकार आहे..

आता कसं बारीक आवाजात बोलतो.. जसं काय कळ निघतंय त्याला.. जरांगे साहेब म्हणतोय आता.. पहिल्यांदा नीट राहिला असतं तर जमलं नसतं का.. दिसतंय पण कसं.. रंग बदलणारा.. रंग्या.. गप्प मरायचं ना..

मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरांगे-पाटील तुम्ही बोलू नका.. मी त्याला समज दिली.. मी गप्प बसलो म्हटलो म्हाताऱ्याला कशाला बोलायचं. मी चार दिवस काही बोललो का?

मग काल… हळूच बारीक आवाजात बोलतो.. द्या त्यांना सगळंच.. बंगले बांधा त्यांच्यापाशी.. येडपट, बुजगावणं कुठचं.. माझी शाळा काढतो.. कसं केलं याला मंत्री.. महाराष्ट्राला कलंक आहे.. डबडं.. तू थांब एकदा.. आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो.. तुझी खूप दिवसांपासून फडफड सुरू आहे.

आम्ही गप्प बसलो की, काड्या करतो.. मग तो सुरू करतो.. मी चवताळलो की, मला नाही निघत दम.. मी ओरिजनल मराठ्यांची औलाद आहे.. दम नसतो काढत..

आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे.. त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आमची सगळ्यांची वेदना एकच आहे.. मराठ्याच्या लेकरांना आरक्षण मिळून द्यायचं.. त्या एकट्याचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल. त्याचं ऐकू नाही.. देशातले जेवढे राज्य आहेत त्यातील मोठी जात संपविण्याचा घाट तुम्ही घातलाय.

पण शेवटी एकदा जर मोठा समुदाय खवळलेला.. शांततेत का होईना.. तुमचा सुपडा साफा होईल मग.. मराठ्यांना तळपवू नका.. तुम्ही एकदा प्रयोग केलाय. अंतरवालीत केलेल्या प्रयोग तुम्हाला भोवतोय.. त्यामुळे सामंजस्याने आरक्षण द्या. पण तुम्ही मराठ्यांवर अन्याय केलं तर येणारं पुढचं आंदोलन तुम्हाला जड जाईल.

समाजाशी गद्दारी करायला आंदोलन केलेलं नाही.. ही एकट्या बीडमधील ताकद आहे. यांचा प्रॉब्लेम हा तोच आहे की, मी त्यांना मॅनेज होत नाही.. माझं आणि पैशाचं जमत नाहीत. मी काय चुकीचं करतोय?

या संधीचं सोनं करा.. आपल्याला आरक्षण 100 टक्के मिळतंय त्यात काही कारण नाही. देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि तेच आपण घेणार. आपल्या नोंदी सापडल्या आहेत.

कधीपर्यंत झोपणार सरकार? आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले आहेत. सरकार मराठ्यांचं अपमान करतंय, फसवणूक करतोय. काही झालं तरी मागे हटायचं नाही.. एवढे माझ्या मागे असतील तर मी कोणालाच घाबरायचो नाही.. मी असाच त्यांना मोजतही नाही.. आता तुम्ही आणि महाराष्ट्रातील लोकं सोबत असतील तर..

बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं.. मराठ्यांना नादाला लागला की, संपला.. त्याचा विषयच आवरला.. आपली मतं घेण्यापुरता दारात आला तर त्याला चपलेनेच वाजवायचं..

आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुडदे हसत बघता.. तुम्हाला लाजा वाटत नाही? राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय.. एका दणक्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत, नाटकं कशाला?

माझी सरकारला पुन्हा विनंती आहे.. मराठा समाजाला डिवचू नका.. यांना काय वाटलं होतं की, त्या मागे केसेस झालेल्या.. त्यांना वाटलेलं आपण भितो..

त्यांनी पूर्वी आपल्याला गुंतवायचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा एक डाव रचला.. म्हणे आपल्याला नोटीसा देऊ.. किती बधीरसारखे वागू लागले हे मंत्री लोकं.. आरक्षण आम्ही हिसकावून आणणारच..

मराठा बांधवांना विनंती आहे.. की, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय. महाराष्ट्राच्या मराठ्यांनी आंदोलन करायचं.. पण शांततेत.. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. म्हणून आरक्षण निर्णय प्रक्रियेत आलं आहे.

शब्द पाळायचा, मोडायचा नाही.. किती तारीख ठरायची तुमच्या अंदाजाने.. मुंबई-मुंबईच म्हणताय.. आम्ही सहन तरी किती दिवस करायचं.. तुम्ही माझ्याकडून 30 दिवस, नंतर 40 दिवसांचा वेळ घेतला.. पुन्हा दोन महिन्यांचा वेळ घेतला होता. 24 डिसेंबरपर्यंत.. तुम्ही किती दिवस आम्हाला मूर्ख समजणार आहात.

आम्हाला काय तरी मर्यादा आहे.. मला असं वाटतं.. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तयारीला लागा.. तुम्ही पंधरा म्हणाले पण पंधरा नाही.. त्यांनी काय डाव टाकला ते माहितेय का तुम्हाला?

त्यांनी आपल्याला नोटीसा दिला.. आणि मुंबईला 144 लागू केला कितीपर्यंत तर 18 तारखेपर्यंत.. चलो 20 जानेवारी मुंबईला.. आमरण उपोषणाला.. आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार.. अशी घोषणा जरांगे-पाटील यांनी यावेळी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT