Pune Accident : दोन जणांना उडवणाऱ्या बिल्डराच्या मुलाला जामीन कसा मिळाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune accident news minor accuse court granted bill on these term and codition pune news
दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डराच्या मुलाला 14 तासांत जामीन
social share
google news

Pune Accident News : ओंकार वाबळे, पुणे : पुण्यात पोर्शे कार चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने दोन जणांना भीषण धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची घटना घडली होती. मद्यधुंद नशेत गाडी चालवणाऱ्या या मुलाकडून कल्याणीनगर परिसरात ही घटना घडली होती. या घटनेनंतर येरवडा पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केला होता. या घटनेत आता 14 तासात अग्रवाल बिल्डराच्या आरोपी पोराला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलाला जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत. या अटी नेमक्या काय आहेत? आणि हे संपुर्ण प्रकरण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.  (pune accident news minor accuse court granted bill on these term and codition pune news) 

पुण्यातील अकिब रमजान मुल्ला यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर आरोपी मुलावर IPC 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमदर्शनी आरोपी हा दारु प्यायला होता,असा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली होती. मात्र या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने आरोपीला जामीन मंजुर केलाय. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यकारक आहेत. या अटी कोणत्या होत्या त्या जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis : फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story

न्यायालयाच्या अटी व शर्ती 

1.वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहुन वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2.वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.

3.वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.

ADVERTISEMENT

प्रकरण काय? 

आरोपी मुलगा हा पबमधून पार्टी करून घरी जायला निघाला होता. त्याचवेळी कल्याणी-विमानतळ रोडवर वेगात गाडी चालवत असताना त्याच्या पोर्शे कारने एका दुचाकीला जबर धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे दुरवर फेकले गेले होते. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. रात्री अडीच वाजता ही घटना घडली.दुचाकीला धडक दिल्यानंतर पोर्शे गाडीच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, लोकांनी त्याची गाडी अडवली. त्याला पकडून जबर चोप दिला. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.  

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "शरद पवार म्हणतात ते खरं आहे, मला 2014 पासून भाजपसोबत...",

कल्याणी नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांनी पाहणी केली. आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी 200 च्या स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अश्विनी कोष्टा अनिस अहुदिया या दोघांचा मृत्यू झाला हे दोघं राजस्थानचे राहणारे होते. पुण्यात कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारात दोघांना उडवलं. यात त्यांचा मृत्यू झाला. पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. या सर्व प्रकाराची पोलिसांनी पाहणी केली आरोपीला अटक केली आहे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT