Devendra Fadnavis : फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

मोदींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्यास का सांगितले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस.
social share
google news

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात आले. त्यावेळी शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. पण, नंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत ते सरकारमध्ये सामील झाले. आधी तयार नसलेले फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री का झाले, त्याला कारण होतं मोदींचा फोन... मोदींनी फोन करून फडणवीसांना काय सांगितलं होतं? (Why did PM Modi call Devendra Fadnavis and ask him to take oath as Deputy Chief Minister)

भाजप-शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्यास का नकार दिला होता आणि मोदींनी फोन केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ का घेतली? याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे.

हेही वाचा >> पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं? 

'द लल्लनटॉप'ला देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची... पण, सुरूवातीला यासाठी तुम्ही तयार नव्हता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले उत्तर?

या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "ज्यावेळी आम्ही एकनाथ शिंदेंजीसोबत जायचं ठरवलं. तेव्हा माझी अशी भूमिका होती की, शिंदेजींनी मुख्यमंत्री व्हायला हवं. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यानंतर माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो."

हेही वाचा >> "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर?

"त्यांना (भाजप नेते) वाटत होतं की, आमच्या ११५ जागा आहेत, असं कसं होऊ शकतं. पण, हायकमांडलाही वाटलं की, यामुळे शिंदे गटाच्या लोकांना आत्मविश्वास निर्माण होईल. आणि एक मेसेज जाईल की, जर आम्ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, तो त्यांना बनवलं असतं."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "उद्धव ठाकरेंना मी पाच वेळा बोललो, भाजपसोबत युती करा"

"ज्यावेळी हा निर्णय झाला, त्यावेळी मी पक्षाला सांगितलं की, मला सरकारमधून बाहेर राहू द्या. याचं कारण असं होतं की, मला वाटलं की लोकांच्या मनात माझी प्रतिमा हपापलेला नेता अशी बनेल. आधी मी मुख्यमंत्री होतो आणि आता सत्तेच्या लालसेपोटी मी उपमुख्यमंत्रीपदही घेतलं."

ADVERTISEMENT

आधी मागणी मान्य, नंतर उपमुख्यमंत्री होण्याची सूचना

फडणवीस यांनी सांगितले की, 'पक्षाने माझं म्हणणं ऐकलं. पण, शपथविधी सोहळ्याच्या आधी अमित शाह आणि नंतर पंतप्रधान मोदी यांनी मला फोन केला आणि उपमुख्यमंत्री होण्याची विनंती केली."

मोदींनी फडणवीसांना काय सांगितलं?

मोदींनी फडणवीस यांना फोन केला. फोन करून ते म्हणाले की, "एक नेता म्हणून तुम्हाला संभ्रम होऊ शकतो, पण एक कार्यकर्ता म्हणून संदिग्धता असायला नको. कारण पक्षाचे नेते तुम्ही आहात आणि कोणतंही सरकार बाहेर राहून चालू शकत नाही. घटनाबाह्य पद्धतीने सरकार चालवलं जावं हे आम्हाला मान्य नाही. हे योग्य पद्धतीने चालले पाहिजे. तुमच्याजवळ अनुभव आहे आणि आपण सर्वात मोठा पक्ष आहोत. या सरकारची स्टिअरिंग आपण करायला हवे आणि त्यासाठी तुम्ही असायला हवे", असे मोदींनी म्हणाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

नाराज झालो, पण...

फडणवीस पुढे म्हणाले की, "नाराज होऊन ही ऑफर स्वीकारली. जेव्हा मोदींनी याबद्दल ट्विट केले, तेव्हा मला देशभरातली कार्यकर्ते आणि नेत्यांचे फोन आले. ज्या प्रकारचा त्याग आपण केलात, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे."

    follow whatsapp

    ADVERTISEMENT