पुणे हादरलं! कॉलेजजवळच 10 सिलिंडर फुटले, नेमकं प्रकरण घडलं कसं?
पुण्यातील सिम्बॉयोसिस कॉलेजजवळ बेकायदेशीररित्या ठेवलेल्या 100 सिलिंडरपैकी 10 सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सिलिंडर का आणि कोणी ठेवले होते, त्याचा तपास करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
Pune Blast: पुण्यात आज दुपारी विमाननगरच्या सिम्बॉयोसिस कॉलेजजवळ (Symbiosis College) असलेल्या रोहन मिथिला इमारतीजवळ सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. इमारतीजवळ जवळ 10 सिलिंडरचा स्फोट (Cylinder blast) झाल्याने जोरदार आवाज झाला. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग अटोक्यात आणण्यात आली.
ADVERTISEMENT
बेकायदेशीर साठा
सिम्बॉयोसिस कॉलेजजवळ असलेल्या रोहन मिथिला इमारतीजवळ बांधकाम सुरू होते, त्या इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या सिलिंडरचा साठा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये 100 पेक्षाही जास्त सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. त्यातील 10 सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा >> शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, उच्च शिक्षित तरुणाला ठोकल्या बेड्या
मोठी दुर्घटना टळली
या दुर्घेटनेत 10 सिलिंडरचा स्फोट झाला असला तरी यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
हे वाचलं का?
#WATCH | Maharashtra | At least 10-12 LPG cylinders exploded near Symbiosis College in the Viman Nagar area of Pune city. Around 100 LPG gas cylinders were stored illegally in an under-instruction site. Out of 100 LPG cylinders, 10 cylinders exploded after a fire. 3 fire tenders… pic.twitter.com/dPzcEznUSn
— ANI (@ANI) December 27, 2023
ADVERTISEMENT
सिलिंडरचा साठा कशासाठी
अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले की, रोहन मिथिला इमारतीजवळ असणाऱ्या होरिझन डेव्हलपर्स, निऑन साईटसजवळ बांधकाम कामगारांसाठी पत्र्याची शेड उभा करण्यात आली होती. त्या शेडजवळच असलेल्या एका पत्र्याच्या रुममध्ये शंभरच्या वर घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्याच सिलिंडरमधील दहा सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. मात्र यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही.
ADVERTISEMENT
प्रकल्पाची चौकशी सुरू
या स्फोटाची चौकशी सुरू केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचा साठा का करण्यात आला होता. त्याचा तपास करण्यात येत असून हा प्रकल्प कोणाचा आहे त्याचाही तपास करण्यात येत आहे. या स्फोटाचे नेमके कारण समजले नसून त्याचाही तपास केला जात आहे.
हे ही वाचा >> Video : साऊथ आफ्रिकेचा बॉलवर तोंडावर पडला, राहुलला स्लेज करायला गेला अन्…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT