Viral Video: विमानात अचानक सर्व स्क्रीनवर सुरु झाली 'Adult Film', प्रवाशांनी पॉज करण्याचा प्रयत्न केला पण...
Qantas Flight Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका खळबळजनक घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. कंतास QF59 या विमानाने ऑस्ट्रेलियाहून जपानला जाण्यासाठी उड्डाण घेतली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विमानात अचानक अडल्ट फिल्म सुरु झाल्यानंतर काय घडलं?
प्रवाशांनी फिल्म पॉज करण्याचा खूप प्रयत्न केला, पण घडलं असं काही...
त्या विमानातील धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल
Qantas Flight Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका खळबळजनक घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. कंतास QF59 या विमानाने ऑस्ट्रेलियाहून जपानला जाण्यासाठी उड्डाण घेतली होती. सिडनी विमानतळावरून प्रवाशांनी भरलेलं हे विमान जपानच्या हानेदा या ठिकाणी जायला निघालं होतं. परंतु, विमानाने उड्डाण घेताच चुकून सर्व स्क्रीनवर अडल्ट फिल्म सुरु झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. प्रवाशांनी चॅनल बदलण्याचा प्रयत्न केला, पंरतु तांत्रिक बिघाडामुळे व्हिडीओला पॉज करणं शक्य झालं नाही. (A video of a sensational incident has gone viral on social media. Qantas QF59 was flying from Australia to Japan)
ADVERTISEMENT
या विमानात सुरु झालेला 'डॅडीओ' चित्रपट आर रेटेड फिल्म कॅटेगरीत येतो. अशा अडल्ट फिल्ममध्ये न्यूडीटी, सेक्स सीन्स आणि अश्लील भाषा वापरली जाते. विमानातील स्क्रीनवर अडल्ट फिल्म सुरु झाल्याने सर्वच प्रवासी थक्क झाले. हा चित्रपट जवळपास एक तास सुरु होता. त्यानंतर लहान मुलांच्या आवडीचा चित्रपट या स्क्रीनवर लावण्यात आला.
विमानात असलेल्या प्रवशांनी डॅडीओ ही अडल्ट फिल्म पॉज किंबा बंद करता आली नाही, असं बोललं जात आहे. तसच कंतास एयरलाईन्सने या धक्कादायक प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केल्याचं समजते. तसच या घटनेचा तपास सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. "विमानात अशाप्रकारचा चित्रपट सुरु झाल्याने आम्ही सर्व प्रवाशांची माफी मागतो. काही वेळानंतर तो चित्रपट बंद करण्यात आला आणि त्यानंतर सर्व स्क्रीनवर फॅमिली मूव्ही लावण्यात आली. तो चित्रपट कशामुळे सुरु झाला, याचा आम्ही तपास घेत आहोत", अशी माहिती कंतास ऐअरलाईन्सच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना दिली.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Garba Shocking Video: अरे बापरे... गरबा खेळता-खेळता आला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय?
इथे पाहा व्हिडीओ
डॅडीओ चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शीत झाला होता. हॉलिवूड स्टार सीन पेन आणि डकोटा जॉन्सन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. एक महिला न्यूयॉर्क विमानतळावरून ट्रक्सीने प्रवास करते आणि ती महिला आयुष्यातील आलेले अनुभव कार चालकाला सांगते, अशी या चित्रपटाची स्टोरी आहे. हा चित्रपट कंतास विमानात सुरु केल्यानं प्रवाशांनी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT