रायगड: समुद्रात मृत्यूचं तांडव; दिवे-आगरमध्ये आळंदीतील 8 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई तक

रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या आठ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

ADVERTISEMENT

raigad diveagar beach tragedy eight drowned during pune aalandi class trip
दिवे-आगरमध्ये आळंदीतील 8 जणांचा बुडून मृत्यू
Google CTA

मेहबूब जमादार, रायगड: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली आहे. फिरण्यासाठी आलेल्या आठ जणांचा समुद्राच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. यावेळी समुद्रकिनारी गेलेल्या आठ जणांचा पाण्यात बुडण्याचा प्रकार घडला. आठही जण बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने समुद्राच्या दिशेने धाव घेतली.

स्थानिकांकडून तातडीने बचावकार्य

स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेल्या आठही जणांना समुद्राबाहेर काढले. त्यानंतर त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आले. स्थानिकांनी त्यांना तातडीने सीपीआर देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आठही जणांचा जीव वाचवण्यात यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेनंतर बचावकार्य आणि पुढील आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.