काळीज पिळवटून टाकणारी बातमी! दिवेआगर समुद्रात बुडालेल्या 8 विद्यार्थ्यांची नावं आली समोर

मुंबई तक

रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी बुडून मृत्यू झालेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे समोर आली असून, सर्व विद्यार्थी आळंदी येथील असून त्यांचे वय 16 वर्ष आहे. विनर्स अकॅडमीच्या सहलीदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे आळंदीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

raigad diveagar beach tragedy eight students death names
दिवेआगरमधील समुद्रात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Google CTA

रायगड: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th या खासगी अकॅडमीच्या सहलीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व 8 विद्यार्थी अवघ्या 16 वर्षांचे होते. या घटनेमुळे आळंदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रायगड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गुरुवारी, 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. या सहलीत 25 मुले, 17 मुली आणि सहा शिक्षक, असे एकूण 48 जण सहभागी झाले होते.

समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज चुकला

दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 8 जण समुद्रात पोहत होते. मात्र, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे आठही विद्यार्थी पाण्यात बुडाले. या घटनेनंतर समुद्रकिनारी एकच धावपळ उडाली.

हे ही वाचा>> रायगड: समुद्रात मृत्यूचं तांडव; दिवे-आगरमध्ये आळंदीतील 8 जणांचा बुडून मृत्यू

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यांना किनाऱ्यावर आणून वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली.