Sharad Pawar Ajit Pawar meet : ‘तुम्ही माझं ऐकत नाही’, ‘त्या’ भेटीनंतर राज ठाकरेंचं मोठं भाकित
शरद पवार अजित पवार गुप्त भेट : राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला. अजित पवार हे शरद पवारांच्या सांगण्यावरूनच भाजपसोबत गेलेत असा दावा त्यांनी केलाय.
ADVERTISEMENT

Sharad Pawar meets ajit pawar news : शरद पवार-अजित पवार भेटीने महाराष्ट्रातील राजकारणात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी भाजपसोबत घेऊन जाण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्ने सुरू आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांकडून मात्र याचा इन्कार केला जात आहे. अशात राज ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांकडे बोट केले आहे.
उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या घरी शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नव्या शक्यता या भेटीनंतर व्यक्त होऊ लागल्या आहेत. अशात राज ठाकरेंनी मोठं भाकित केलंय.
राज ठाकरे पवार काका-पुतण्या भेटीवर
मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “माझं ऐकत नाही तुम्ही. सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वतःचं आहे ते. एक टीम त्यांनी अगोदर पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. हे आज नाही. 2014 पासून मिळालेले आहेत.”
वाचा >> शरद पवार-अजित पवारांची भेट भाजपसोबत जाण्यासाठी नाही, तर…; कारण आलं समोर
“तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर झालेल्या गोष्टी आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया याठिकाणी मिळाली. या नावावरती मिळाली हे पण कमाल आहे”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.










