Mahayuti : “मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, सदाभाऊंनी भाजपवर काढली भडास
Sadabhau Khot News : सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या मेळाव्यात भाजपसह इतर घटक पक्षांबद्दलची खदखद व्यक्त केली. मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला.
ADVERTISEMENT
Sadabhau Khot News : “मी मुंबईतील बैठकीला गेलो. आम्हाला म्हणाले कामाला लागा. मी विचारलं तुम्ही आम्हाला काय बँडवाले समजलात का? आम्हाला वाजवायला ठेवलंय का? काही जण आम्हाला बघून हसतात, पण हसू नका. मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी भाजपबद्दलची भडास व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सदाभाऊंनी केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरलं आहे. (Sadabhau Khot Has been Attacked On BJP in Mahayuti Melava)
ADVERTISEMENT
लोकसभा २०२४ निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिल्ह्याजिल्ह्यांत महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व घटक पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न असताना उलटच घडताना दिसत आहे. सांगलीत असंच काहीसं घडलं.
हेही वाचा >> “…तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का?”, गुलाबराव पाटलांचा भाजपला रोकडा सवाल
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भाजपसह महायुतीतील प्रमुख पक्षांवर हल्लाबोल केला.
हे वाचलं का?
सदाभाऊ खोत काय बोलले?
भाषणात सदाभाऊ खोत म्हणाले, “आम्हाला काही दिलं नाही, तरीही आम्ही तुमच्यासोबत आहोत. मुंबईत बैठकीला गेलो, तेव्हा आम्हाला म्हणाले की, ‘कामाला लागा. योजना लोकांपर्यंत पोहोचवा.’ मग मी विचारलं, तुम्ही आम्हाला काय समजलंय, आम्हाला बँडवाले समजले आहात का? लग्नाचा सिझन आला की, ताशा कुठेय पहा, पिपाणी कुठेय पहा. म्हणजे आम्हाला वाजवायला ठेवलंय का?”, असा संताप सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
घटक पक्षांनाही सन्मान द्या -सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, “तुम्ही आमचा अपमान करू नका. आम्ही लढणारी माणसं आहोत, त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांसाठी लढणार आहोत. घटक पक्षांनाही सन्मान द्या. कुणी आलं की, काहीजण बघून हसतात. बघून हसू नका. मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी महायुतीतील पक्षांना सुनावलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : “नवरीचा पत्ता नाही, नवरा…”, राणेंनी इच्छुकांचे टोचले कान
महायुती मेळाव्यातील भाषणात सदाभाऊ खोत असंही म्हणाले की, “आम्ही चळवळीतील नेते आहोत. शेवटी आमची निवडणुकीच्या तोंडावर आठवण आली. सत्तेच्या काळात घटक पक्षांना उचित सन्मान दिला नाही. निधीही दिला नाही. सर्व घटक पक्षांना तुम्ही बोलवायला हवं होतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही खुरपी घेऊन आलोय, तण काढतोय; पण आमची उपेक्षा करू नका”, असा गर्भित इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT