Maratha Reservation : संजय राऊत संतापले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ज्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राणपणाला लावून आंदोलन केले. ते जरांगे पाटलांचे आंदोलन अश्वासन देऊन कॅबिनेटच्या बैठकीआधी हे आंदोलन संपवायचे आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ADVERTISEMENT

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आता कॅबिनेटची बैठक मराठवाड्यात घेतात. त्या कॅबिनेट बैठकच्या आधीच जरांगे-पाटलांचे (Manoj Jarange Patil) उपोषण गुंडाळायचे आहे, त्यासाठी त्यांना अश्वासन देण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू असल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी सरकारवर टीका करताना त्यांनी जरांगे पाटलांचे कौतुक करत सरकारने जरांगे-पाटील यांच्या अश्वास कॅबिनेटच्या आधी उपोषण गुंडाळायचे आहेत, त्या कॅबिनेटला अपशकून नको म्हणून हे आंदोलन गुंडाळायचे आहे.
सरकारने दखल घ्यावी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने निजामशाही कालीन ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील त्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर जरांगे पाटील यांनी त्या अध्यादेशामध्ये काही त्रुटी असल्याचे सांगत त्यामध्ये सुधारणा करण्याी मागणी केली. त्यामुळेच खासदार संजय राऊत यांनी या तरुणाने आरक्षणासाठी जीव पणाला लावले आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी असंही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचा >> pusesawali satara : पुसेसावळीत हिंसेंची धग कायम! पोलिसांनी कुणाला ठोकल्या बेड्या?
विषय स्वाभिमानाचा
मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या आंदोलनाची योग्य दखल घेऊन निर्णय घ्यावा असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्यांच्या स्वाभिमानाचा हा विषय असल्यामुळेच मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपला जीवपणाला लावला आहे.
मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीचे मराठवाड्यात आयोजन केले आहे. त्याआधीच जरांगे पाटलाचे आंदोलन गुंडाळायचे असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कॅबिनेट बैठकीला कोणत्याही प्रकारचा डाग नको, मंत्री आणि आमदारांच्या गाड्यावर लोकांकडून हल्ले केले जाऊ नयेत यासाठीच एकनाथ शिंदे यांना जरांगे-पाटलांचे आंदोलन गुंडाळायचे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.