NCP : “जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता”, शिंदेंच्या नेत्याचं स्फोटक दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay shirsat big statement about jayant patil
Sanjay shirsat big statement about jayant patil
social share
google news

– इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat on Jayant Patil Maharashtra Politics : ‘जयंत पाटील हे शरीराने फक्त शरद पवारांसोबत आहेत. ते मनाने इकडे (अजित पवारांसोबत) आहेत’, असे सांगत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक स्फोटक दावा केला. हा दावा करताना मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याच्या कारणाबद्दलही त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन राजकीय भूकंप झाले. या भूकंपानंतर महाविकास आघाडीतील दोन मोठ्या नेतेही महायुतीमध्ये जाणार, अशी चर्चा सातत्याने होत असते. यात एक नाव असतं अशोक चव्हाणांचं, तर दुसरं जयंत पाटील यांचं. काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपसोबत येणार असल्याचे विधान केले होते. त्यावर अशोक चव्हाणांनी खुलासा करत पडदा टाकला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार?

शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवारांनी बंड केलं. आमदारांचा मोठा गट घेऊन ते सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर जयंत पाटील यांच्याबद्दलही अशाच चर्चा सातत्याने होत आहेत. या मुद्द्याने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. याला कारण ठरलं आहे संजय शिरसाट यांनी केलेलं एक विधान.

संजय शिरसाट जयंत पाटलांबद्दल काय म्हणाले?

“भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव जयंत पाटलांनीच दिला होता. याबाबत चर्चा झाली होती. आपण सर्व मिळून शरद पवारांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे (शरद पवारांकडे) आहेत, मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे, जयंत पाटील येणार होते म्हणून मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> एलएसडी, चरस घेऊन रेव्ह पार्टी; 12 तरुणी, 90 तरुणांना…

“त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. पण, ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही”, असे सांगत संजय शिरसाट यांनी राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो याबद्दल सूचक वक्तव्य केले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “भावी खासदार पोस्टर लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम”, फडणवीसांचा इशारा

संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर जयंत पाटील यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या विधानाने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

राष्ट्रवादीतील बंडावर जयंत पाटील काय बोललेले?

“राष्ट्रवादी हा पक्ष एकसंध राहावा, यासाठी मी प्रयत्न केले. लोकांना वाटलं मीही तिकडे जाईल. पण मी पवारसाहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ज्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला, त्याला त्यांची काही कारणं आहेत. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी जर पवार साहेबांना सोडलं असतं, तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडला असता. माझ्यावर विश्वास असताना मी त्यांना सोडलं असतं तर ते योग्य झालं नसतं”, असं जयंत पाटील अमोल कोल्हेंना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

नवाब मलिकांपासून अंतर

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचे अधिवेशन काळातील त्यांच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाले. मात्र, त्यांच्या अजित पवार गटातील सहभागाने भाजपला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर भाजपने पत्र लिहून स्पष्ट विरोध केला. भाजपच्या विरोधानंतर अजित पवार गटाने नवाब मलिक यांच्यापासून अंतर राखलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT