वाल्मिक कराडला कारागृहात गंभीर संसर्ग, गेल्या 3 दिवसांपासून सलाईनवर

मुंबई तक

Walmik Karad Jail Update : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मीक कराड याला जिल्हा कारागृहात गंभीर संसर्ग झाला असून, त्याला उपचारासाठी आंबेजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ADVERTISEMENT

Walmik Karad Jail Update
Walmik Karad Jail Update
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडला कारागृहात गंभीर संसर्ग

point

गेल्या 3 दिवसांपासून सलाईनवर

Walmik Karad Jail Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या खळबळजनक हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याची प्रकृती बीड जिल्हा कारागृहात अचानक खालावली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून आरोपी वाल्मीक कराड बीड जिल्हा कारागृहामध्ये सलाईनवर आहे. कारागृहातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती थोडीशी खालावल्याची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा मुख्य आरोप असलेला वाल्मीक कराड सध्या कोठडीत असून बीड जिल्हा कारागृहात आपली शिक्षा भोगत आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांना अंगाची लाही लाही, IMD अलर्ट

गेल्या तीन दिवसांपासून वाल्मीक कराड याला प्रायव्हेट पार्टच्या जागी तीव्र त्रास होत असून त्याला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर त्रासामुळे त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासली आहे. त्याला झालेल्या या संसर्गाची परिस्थितीची कारागृह प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : "हाडांपर्यंत जखम, डाव्या कानातून रक्त..'', लग्नात 1 कोटी खर्चून सुनेला हुंड्याची मागणी

युरोसीसटायटीस संसर्गाचा प्राथमिक अंदाज

आरोपी वाल्मीक कराड याला तपासणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, त्याला 'युरोसीसटायटीस' (Eurocystitis) नावाचा अत्यंत गंभीर संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा संसर्ग बऱ्याच अंशी पसरल्यामुळे त्याला हा तीव्र त्रास होत असून त्याच्यावर सध्या तात्पुरते उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. मात्र, कारागृहातील मर्यादित सुविधांमुळे त्याच्यावर योग्य आणि सखोल उपचार करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता कारागृह प्रशासनाकडून आरोपी वाल्मीक कराड याला पुढील उच्च उपचारांसाठी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याच्या हालचाली वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत.

येत्या गुरुवारपर्यंत त्रास कमी न झाल्यास ...

प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, आरोपी वाल्मीक कराड याच्या आरोग्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. येत्या गुरुवारपर्यंत वाल्मीक कराड याचा हा शारीरिक त्रास कमी झाला नाही किंवा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर त्याला पुढील आणि विशेष उपचारासाठी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलवण्यात येणार आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या या आजारपणामुळे आणि रुग्णालयात हलवण्याच्या हालचालींमुळे बीड जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?