Love Story : ट्यूशनला जाणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला सिक्युरिटी गार्ड; पळून जातं थाटला संसार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Assam security guard Love Stor
Assam security guard Love Stor
social share
google news

Love Story :

ADVERTISEMENT

आसाममध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांची लव्ह स्टोरी जगासमोर आणली आहे. कधीकाळी पेशाने सिक्युरीटी गार्ड राहिलेल्या सोनू छेत्री आणि ईशा यांची ही लव्ह स्टोरी आहे. सोनू छेत्री आजच्या घडीला प्रसिद्ध यु-ट्यूबर असून त्याच्या Sonu Vlogs नावाच्या चॅनेलला तब्बल 5 लाख सबस्क्राईबर आहेत. (The security guard fell in love after seeing the girl going for tuition, both eloped and got married)

कधी फुलली सोनू-ईशाची लव्ह स्टोरी?

सोनू छेत्रीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, ट्यूशनला जाताना त्याने ईशाला पहिल्यांदा पाहिलं. ईशाला पाहताच पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. व्हिडिओमध्ये सोनू म्हणाला- एक दिवस मी माझ्या मावशीच्या घरी आलो होतो. ईशाही त्याच गावात राहायची. एके दिवशी ती संध्याकाळी ट्यूशनला जात होती. त्यावेळी मी तिला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत प्रेमात पडलो.

हे वाचलं का?

हेही वाचा : ब्रेकअप झालं? निराश होऊ नका… सरकार करणार तरुणांना मदत

तर ईशाने सांगितलं की, तिने सोनूला पहिल्यांदा क्रिकेट खेळताना पाहिलं होतं. सोनूने व्हिडिओमध्ये सांगतो की, तिच्या नातेवाईकांनीही ईशाचं कौतुक केलं होतं. ईशा खूप छान मुलगी आहे, तू तिच्याशी लग्न कर, असंही सांगितले होतं, त्यानंतर त्याने आपण ईशाशीच लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं.

ईशा आणि सोनू यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली?

सोनूने व्हिडिओमध्ये सांगितलं की, तो बंगळुरूमध्ये राहत असताना सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत होता. यादरम्यान त्याला ईशाचा मोबाईल नंबर मिळाला आणि एके दिवशी त्याने ईशाला मेसेज केला. ईशाने सांगितले की, जेव्हा सोनूचा मेसेज आला तेव्हा मी खूप घाबरली होती. मी तेव्हा बारावीत होती आणि नवा-नवाच मोबाईल मिळाला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : ब्रेकअपनंतर काय करायचं? IAS अधिकाऱ्याने दिला ‘हा’ सल्ला

सोनूने म्हणतो की, प्रेमात पडल्यामुळे सुरक्षा रक्षकाचे काम करु वाटतं नव्हते. याबाबत अनेकदा आमचं बोलणं व्हायचं. सोनू हसत हसत म्हणतो की, “पहली बार प्‍यार हुआ था, तो मैं जॉब से दूर और इसके प्‍यार में चूर रहता था”. सोनूने बोलता बोलता ईशाला अनेकवेळा प्रपोज केलं, पण ईशाने त्याला काहीच उत्तर दिलं नव्हतं. या दरम्यान लॉकडाऊन लागलं आणि सोनू घरी परतला. तब्बल 8 महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर ईशाने सोनूला होकार दिला.

ADVERTISEMENT

रिलेशनशिपमध्ये ट्विस्ट, ब्रेकअप आणि लग्न…

सोनूने दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ईशाच्या कुटुंबीयांना त्या दोघांबद्दल फारशी माहिती नव्हती. एक दिवस त्याने ईशाच्या आईला फोन करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. यानंतर ईशाचे कुटुंबीय चांगलेच संतापले. त्यानंतर काही काळ ईशासोबत ब्रेकअप झालं. पण, काही दिवसांनी दोघेही पुन्हा बोलू लागले. यानंतर सोनू आणि ईशा यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : ‘सोशल वर्कर’च्या प्रेमात पडली महिला IPS, अशी आहे Love Story…

सोनूने पहिल्यांदा याबाबत भावाला कल्पना दिली. त्यानंतर सोनूने ईशाला त्याच्या मावशीच्या घरी नेलं. सोनूला मुलीसोबत पाहून सुरुवातीला मावशीला आश्चर्य वाटलं. काही दिवसात सोनूने आईलाही ईशासोबत पळून गेल्याचं सांगितलं. त्यानंतर सोनूच्या आईने ईशाला घरी आणावं म्हणून सोनूला गळ घातली तसंच सोनू आणि ईशाचं लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर सोनू आणि ईशाने घराजवळील मंदिरात लग्न केलं. मात्र, ईशा पळून गेल्यानं तिचे कुटुंबीय चांगलेच संतापले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT