Mob Stone Pelting on Train : जळगावमध्ये धावत्या ट्रेनवर तुफान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

Viral Video : नंदूरबार-भुसावळ पॅसेंजर गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

नंदूरबार-भुसावळ पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.
पॅसेंजर ट्रेन दगडफेक होत असतानाच व्हिडीओ व्हायरल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नंदूरबार-भुसावळ पॅसेंजर रेल्वे गाडीवर दगडफेक

point

दगडफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

point

रेल्वे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा केला दाखल

Maharashtra Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडीओत दिसणारी दृश्य भयावर आणि थरकाप उडवणारी आहेत. एक पॅसेंजर ट्रेन धावत आहे आणि तिच्यावर जमाव दगडफेक करत आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशी ओरडत आहेत. (Stone Pelting on Bhusawal Nandurabar Passenger Train)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

शनिवारी (13 जुलै) सोशल मीडियावर एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडीओ एक महिला आणि तरुणी आहे. तर इतर प्रवासीही आहेत. ट्रेन धावत आहे आणि ट्रेनच्या बाहेर लोकांचा भला मोठा जमाव जमला आहे.

हेही वाचा >> पूजा खेडकरांच्या आईच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

हे लोक दगडफेक करत असल्याचे प्रवाशांचं संभाषण सुरू असतानाच त्यांच्या खिडकीवर दगड येतात. त्यामुळे महिला आणि इतर प्रवासी भांबावून जातात. महिला ओरडायला लागतात. 

नेमकी कुठे घडली घटना? 

मिळालेल्या माहितीनुसार दगडफेक ज्या ट्रेनवर झाली, ती भुसावळ-नंदूरबार पॅसेंजर ट्रेन आहे. विभागीय रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमळनेरचे आरपीएफ प्रभारी अधिकाऱ्याने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी रेल्वे कायदा १५४ अन्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्यास करावी, अशा सूचनाही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >> Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज! 

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी माहिती दिली. काही लोक भुसावळवरून भोरटेकला धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. हा शुक्रवारचा व्हिडीओ असून, त्याच ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp