Pooja Khedkar IAS : पूजा खेडकरांच्या आईच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी दाखल केला गुन्हा
IAS Pooja Khedkar Mother : पूजा खेडकर यांची आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती वादग्रस्त ठरली असून, आता त्यांच्या आईविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आयएएस पूजा खेडकरांचे आईवडील अडचणीत

पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर यांच्याविरोधात दाखल केला गुन्हा

मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची दिली होती धमकी
Manorama khedkar News : (ओंकार वाबळे, पुणे) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यापाठोपाठ त्यांची आई मनोरमा खेडकरही वादात सापडल्या आहेत. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंढरीनाथ पासलकर यांनी फिर्याद दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Pune police Filed FIR Against IAS Pooja Khedkar mother Manorama Khedkar)
पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत मनोरमा खेडकर या एका शेतात असून, त्यांच्या हातात पिस्तुल आहे. त्या शेतकऱ्यांला धमकावत असल्याचे दिसत आहे.
मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप काय?
12 जुलै रोजी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध ही तक्रार देण्यात आलेली आहे. तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव पंढरीनाथ पासलकर असे आहे.
पासलकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली येथे सर्व्हे क्रमांक 12/1 आणि 15/1 मध्ये सामाईक जमीन आहे. 2006 मध्ये मनोरमा दिलीप खेडकर यांनी धडवलीमध्ये सर्व्हे क्रमांक 12/1 आणि 15/1 मधील काही जमीन खरेदी केली. पूजा खेडकर यांच्या वतीने मनोरमा खेडकर यांनी ही जमीन खरेी केली होती.