Surat Diamond Bourse: गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला प्रचंड मोठा धक्का, ‘हिरा’ व्यापार हिरावला!
Mumbai Diamond Business: गुजरातमधील सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी तब्बल 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. ज्याचा मोठा फटका हा मुंबईला बसला आहे.
ADVERTISEMENT

Mumbai Diamond Business: मुंबई: मुंबईतील (Mumbai) हिरे व्यापार (Diamond Business) ही खरं मुंबईची शान आहे. पण आता हीच शान कायमची हिरावली जाणार आहे. हे नेमकं कसं घडणार आणि याचे काय परिणाम मुंबईला भोगावे लागणार हे आपण जाणून घेऊया.. सरकारच्या पाठिंब्याशिवाय सुरतच्या (Surat) हिरे व्यापाऱ्यांनी तब्बल 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. सूरत डायमंड बोर्स नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा किताब देखील मिळाला आहे, जे आतापर्यंत पेंटागॉन बिल्डिंगकडे होते. सुरतमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे, कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सुरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. (surat diamond bourse surat gave a big blow to mumbai maharashtra offices started shutting down)
वर्षानुवर्षे सुरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सुरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये पैलू पाडलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिऱ्यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सुरतच्या हिरे कारखान्यांमध्ये पैलू पाडलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागायचं. ज्याद्वारे सुरतमधील हिरे मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जात होते.
या इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध
मात्र, आता असे होणार नाही, कारण गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या डायमंड हब इमारतीमध्ये सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरा व्यवसाय बंद करून सुरतला स्थलांतरित होत आहेत.
हे ही वाचा >> gujarat election : रविंद्र जाडेजा बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्विट करत म्हणाला, अभी टाइम है गुजरातीयों’
सुरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सूरत डायमंड बुर्सचे समिती सदस्य दिनेश नावडिया यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या सूरतच्या खजोद परिसरात ड्रीम सिटी प्रकल्पाच्या 67 लाख चौरस फूट जागेवर प्रत्येकी 14 मजल्यांचे 9 टॉवर्स बांधण्यात आले आहेत. या टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची 4300 कार्यालये आहेत. इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. हा सुरत डायमंड बुर्स अंदाजे 3400 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आली आहेत. सुरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे म्हणून हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त किंमत देऊन सरकारकडून येथे जमिनी खरेदी केल्या होत्या.