Maharashtra Weather: IMD चा इशारा, राज्यभरात थंडीच्या लाट.. आता भरणार हुडहुडी!
Maharashtra Weather : राज्यभरात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पुढचा आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे तर, त्यानंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे तापमानात वाढ होऊ शकते, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा
अचानक थंडी का वाढलीय?
'या' भागांत पहाटे धुक्यांची चादर पसरणार
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पुढचा आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे तर, त्यानंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे तापमानात वाढ होऊ शकते, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे.
हे ही वाचा : फलटणमध्ये शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा लढवणार निवडणूक, दुसरीकडे भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा :
एकूण राज्यातील तापमान कसं आहे?
- जळगाव- 8° से.
- निफाड -8° से.
- पुणे - 10° से.
- नाशिक -10.4° से.
- सातारा - 12° से.
- नागपूर - 9.6° से.
- बदलापूर - 15° से.
- सोलापूर - 15° से.
- ठाणे - 16° से.
- मुंबई - 21° से.
अचानक थंडी का वाढलीय?
तर, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि वातावरणात बाष्पाचा अभाव असल्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडीची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादाळाचा राज्याच्या हवामानावर मोठा परिणाम झाला. वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. त्यामुळे थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 18 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून तापमानाचा पारा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुके
घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरत असून दृश्यता कमी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.










