रायगड हादरलं, शेजारणीने 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला गळा आवळून संपवलं, कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

मुंबई तक

Raigad Crime : रायगड हादरलं, शेजारणीने 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला गळा आवळून संपवलं, कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

ADVERTISEMENT

Raigad Crime
Raigad Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रायगड हादरलं, शेजारणीने 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला गळा आवळून संपवलं

point

कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

Raigad Crime, नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीअंतर्गत कुरकुलवाडी वस्तीत किरकोळ भांडणाच्या रागातून शेजारणीने अडीच वर्षांच्या बालकाचा गळा दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरलाय. शेजाऱ्याची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याची कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे. या प्रकरणात मृत चिमुकल्याचे नाव जयदीप गणेश वाघ असे असून, त्याच्या अचानक मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक कारणांचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नेरळ पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी जयवंताला अटक करण्यात आली असून, तिला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सर्वांना सांगितलं, पण अखेर सत्य समोर आलं

घटनेदिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी जयदीपचे आई-वडील गणेश वाघ आणि त्यांची पत्नी पुष्पा मजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत जयदीप आणि त्याची भावंडे घरासमोर खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणारी जयवंता मुकणे हिने जयदीपला उचलून घराच्या मागील पायवाटेकडे नेले. संतापाच्या भरात तिने चिमुकल्याचा गळा आवळून त्याला ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हा लपवण्यासाठी मुलगा अचानक बेशुद्ध पडल्याचा आणि नैसर्गिक मृत्यू झाल्याचा खोटा प्रसंग तिने उभा केला. मुलाला तातडीने कळंब रुग्णालयात नेले गेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परिस्थितीवर विश्वास ठेवून कुटुंबाने परंपरेनुसार अंत्यसंस्कारही पूर्ण केले.

हेही वाचा : धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले

पोस्टमॉर्टेमसाठी पुरलेला मृतदेह बाहेर काढला

परंतु एका नागरिकाच्या गुप्त माहितीमुळे पोलिसांच्या हातात महत्त्वाचा धागा लागला. नेरळ पोलिस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनात मुलाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले व पोलिसांचा संशय बळावला. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला जयवंता मुकणे हिने मृत मुलाच्या चार वर्षांच्या बहिणीलाही गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी परिस्थिती बिघडली आणि प्रयत्न असफल ठरला. दुसऱ्याच दिवशी तिने एकट्या पडलेल्या जयदीपवर हल्ला करून त्याचा जीव घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp