फलटणमध्ये शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा लढवणार निवडणूक, दुसरीकडे भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई तक

ramraje naik nimbalkar : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल करत निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर झालं आहे. 

ADVERTISEMENT

ramraje naik nimbalkar son aniketraje naik nimbalkar against former bjp mp ranjitsinh naik nimbalkar
ramraje naik nimbalkar son aniketraje naik nimbalkar against former bjp mp ranjitsinh naik nimbalkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रामराजेंचें चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढणार

point

भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाला उमेदवारी 

Ramraje Naik Nimbalkar : राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राज्यात बिगुल वाजले आहे. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होताना दिसते. तर अशातच सातारा जिल्ह्यातील चर्चेत असलेली फलटणची नगरपरिषद आहे. अशातच फलटण म्हटलं की रामराजे नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर म्हटलं की फलटण असा एक दुवा आहे. अशातच आता रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार असल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने विरोधकांनी घेरलं, आता भाजपचा मोठा निर्णय

रामराजेंचें चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढणार

नगरपरिषदेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आता निघून गेला आहे. अशातच अर्ज भरण्याच्या शेवटच्याच दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल करत निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर झालं आहे. 

भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाला उमेदवारी 

तर दुसरीकडे भाजपाकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा फलटणच्या स्थानिक राजकारणाची चर्चा पूर्ण राज्यभरात होऊ लागली आहे. 

अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तसेच विधान परिषदेचे माजी सभापती राहिलेले रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून आता त्यांच्या चिरंजीवाला शिवसेनेतून नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp