एकनाथ शिंदेंच्या होर्डिंगवरून देवेंद्र फडणवीस गायब, ठाण्यात भाजप-सेनेत धुसफूस!
ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेत नाराजी आहे. दुसरीकडे विकासकामांच्या होर्डिंगवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोच लावण्यात आलेला नाही.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. पण, सत्तेत आल्यापासून ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये आलबेल नसल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. याला निमित्त ठरले आहे, शिवसेनेकडून लावण्यात आलेले होर्डिंग!
ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये धुसफुस असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दिवा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वागतासाठी शिवसेनेकडून डोंबिवलीत बॅनर/होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलेले नाही.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यात असलेल्या लोकार्पण कार्यक्रमाचे बॅनर डोंबिवली झळकलेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने हे बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. याबाबत शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितलं की, “हा कार्यक्रम ठाणे महापालिकेचा आहे. महापालिका त्यांचे बॅनर लावेल, मी जे बॅनर लावलेत ते शिवसेनेचे लावलेत.”
हेही वाचा >> कोल्हापुरात हिंसेचा उद्रेक! शरद पवारांचं गंभीर विधान; शिंदे, फडणवीस काय म्हणाले?
“दिव्यात शिवसेनेची भाजपासोबत किती संख्या आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. विरोध करणारी भाजपा ही किती ही निमंत्रण दिले तरी येणार नाही. मग होर्डिंगवर तरी यांचे फोटो कशाला टाकायचे”, अशी टीका माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केली. मढवी यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.