BJP: उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी सुनावलं, म्हणाले; जरा तुमची भाषा…
नागपूरमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरेंना भाषा जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तुफान टीका केली. अत्यंत बोचऱ्या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. असं असताना आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या पक्षातील नेत्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावलं आहे. (uddhav thackeray criticized devendra fadnavis nagpur bjp union minister nitin gadkari advised thackeray use language carefully bjp shiv sena ubt)
‘उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’ असा सल्ला देत नितीन गडकरी यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
नितीन गडकरींना ठाकरेंना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले.
‘श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.
श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 10, 2023