3 बायका अन् फजिती ऐका! तिघींसोबत एन्जॉय करायचा, तो निघाला 'खरा खेळाडू', पण 1 दिवस खेळ झाला खल्लास, घडलं तरी काय?
Today Shocking Viral News : काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचा 'गरम मसाला' चित्रपट गाजला होता. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एकाच वेळी तीन-तीन गर्लफ्रेंड सांभाळत असल्याचं पाहायला मिळालं.

बातम्या हायलाइट

तीन महिलांशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचा असा झाला पर्दाफाश

तो व्यक्ती कसा अडकला जाळ्यात?

व्हायरल स्टोरी वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Today Shocking Viral News : काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचा 'गरम मसाला' चित्रपट गाजला होता. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एकाच वेळी तीन-तीन गर्लफ्रेंड सांभाळत असल्याचं पाहायला मिळालं. एका भामट्याने अशाच प्रकारचा धक्कादायक कारनामा केल्याचं समोर आलंय. या व्यक्तीने एकाच वेळई 3-3 लग्न केले. तिघींसोबत तो एन्जॉय करत होता. पण कोणत्याही पत्नीला माहित झालं नाही की, त्याच्या आणखी दोन पत्नीही आहेत. 50 वर्षांच्या या व्यक्तीची अखेर पोलखोल झाली आणि तिनही पत्नीनीं त्याला धक्का मारून आपल्या आयुष्यातून बाहेर केलं आहे.
ही खळबळजनक घटना अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे घडली. हेनरी बेट्से ज्यूनियर नावाच्या व्यक्तीने तीन महिलांची फसवणूक करत त्यांच्यासोबत बेकायदेशीरपणे कोर्ट मॅरेज केलं. बेकायदेशीरपणे लग्न केल्यानंतरही त्याचा हा कारनामा उघडकीस आला नाही. अनेक वर्ष तो व्यक्ती तीन महिलांसोबत वेगवेगळं आयुष्य जगत होता. मागील आठवड्यात अमेरिकेच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आहे.
हे ही वाचा >> टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण अन् मृतदेह...
तो व्यक्ती कसा अडकला जाळ्यात?
हेनरी नेमही घटस्फोटीत सिंगल महिलांची डेटिंग अॅपवर फसवणूक करायचा. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी तो बेकायदेशीरपणे कोर्ट मॅरेज करायचा. त्यानंतर त्यांच्या पैशांनी तो एन्जॉय करायचा. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याने सर्वात आधी टोन्या नावाच्या महिलेशी लग्न केलं. दोन वर्षानंतर त्याची ओळख ब्रँडी नावाच्या महिलेशी झाली. तिच्यासोबतही त्याने लग्न केलं. काही महिन्यानंतर त्याचं तिसरं लग्नही झालं. 23 नोव्हेंबर 2022 मध्ये हरनाडो काउंटीमध्ये त्याने मिशेल नरेन्स नावाच्या महिलेशी लग्न केलं.
त्या व्यक्तीचा असा झाला पर्दाफाश
तीन पत्नींसोबत राहणारा हेनरी त्याचं आयुष्य एन्जॉय करत होता. परंतु, त्याची पहिली पत्नी टोन्याने अचानक तिचं नाव काऊन्टीच्या रेकॉर्डमध्ये शोधलं. त्यानंतर जे सत्य समोर आलं, ते पाहून टोन्याच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण त्याने दुसरं लग्न केल्याचं काऊन्टीच्या रेकॉर्डमध्ये समोर आलं. त्यानंतर आणखी एक रेकॉर्ड समोर आला. टोन्याने सोशल मीडियावर या महिलांचा शोध घेतला आणि त्यांना संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यासोबत किती मोठी फसवणूक झाली आहे. त्यानंतर या तिन्ही महिलांनी त्याला धोका दिला.