Madan Das Devi : RSS चे माजी सह सरकार्यवाह देवी कोण होते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मदन दास देवी यांचं वृद्धपकाळाने बंगळूरमध्ये निधन झालं.
ADVERTISEMENT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मदन दास देवी यांचं वृद्धपकाळाने बंगळूरमध्ये निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. २००२ च्या गुजरात दंगलीनंतर मोदींच्या मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला होता. वाजपयी यांनी मोदींना राजधर्माचे पालन करण्यास सांगितले होते, परंतु त्यावेळी गुजरात मध्ये अशी परिस्थिती होती की मोदींना हटवने शक्य नव्हते, असा खुलासा देवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.
मदनदास देवींनी त्यांचे आयुष्य संघकार्यात घालवले. जवळपास ७० वर्षे त्यानी संघाच्या प्रचारासाठी काम केले. गुजरात दंगलीच्या काळामध्ये मदनदास देवी हे भाजप आणि एनडीएमधील दुवा म्हणून काम करत होते. मदनदास यांनी अभाविपमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. त्याचबरोबर संघाचे सह – सरकार्यवाह म्हणून देखील त्यांनी काम केलं.
‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नवा पायंडा सुरू झाला’, फडणवीसांनी काढला इतिहास
मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मदनदास देवी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, मदन दास देवी यांच्या निधनाबद्दल अतीव दुःख झाले. त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्र कार्यासाठी वेचले. त्यांच्यासोबत माझे नाते खूप घनिष्ठच नव्हते, तर त्यांच्याकडून नेहमीच शिकायला मिळालं. दुःखाच्या क्षणी इश्वर सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती प्रदान करो. ओम शांती.
Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
श्री मदन दास देवी जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने अपना पूरा जीवन राष्ट्रसेवा में समर्पित कर दिया। उनसे मेरा न सिर्फ घनिष्ठ जुड़ाव रहा, बल्कि हमेशा बहुत कुछ सीखने को मिला। शोक की इस घड़ी में ईश्वर सभी कार्यकर्ताओं और उनके परिवारजनों को संबल प्रदान करे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2023
कोण होते मदन दास देवी?
मदनदास देवी यांचं मूळ गाव सोलापुर जिल्ह्यातील करमाळा. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. बीएसीसी मध्ये त्यांनी एम कॉम केलं, नंतर आय़एलएस लॉ कॉलेज मध्ये गोल्ड मेडस पदकासह त्यांनी एलएलबी केलं. राष्ट्रीय स्तरावर रॅंकमध्ये सीए चं शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केलं. अभाविपला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी देशभर प्रवास करत त्यांनी अनेक समर्पित कार्यकर्त्यांनी फळी उभी केली. मंगळवारी (25 जुलै) सकाळी ११ वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.