Mumbai Video: बापरे! ठाण्यात किचनच्या खिडकीतून घरात शिरला महाकाय साप
Massive Snake found in Mumbai Viral Video : ठाण्यातील एका इमारतीतील घराच्या किचनच्या ग्रीलमध्ये महाकाय साप घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Massive Snake found in Thane Viral Video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात, असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एका इमारतीच्या खिडकीत महाकाय साप शिरल्याची घटना घडली आहे. या सापाचा महाकाय अवतार पाहताच तुम्हाला धडकी भरवेल, इतका भयानक हा साप होता. या सापाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता हा साप घरातील किचनमध्ये कसा शिरला? या सापाला घरातून कसे रेस्क्यु करण्यात आले आहे? हे जाणून घेऊयात. (viral video massive snake found in thane building kitchen balcony two men rescue)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका इमारतीच्या खिडकीत एक महाकाय साप दिसत आहे. हा साप एका घरातील किचनच्या ग्रीलला लटकला आहे. हा सर्व प्रकार पाहून त्या घरातील मंडळीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.तसेच सोसायटीच्या नागरीकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.
या सापाला रेस्क्यू करण्यासाठी दोन तरूणांनी पुढाकार घेतल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एक तरूण हा घरातील किचनच्या बाल्कनीत उभा असून, सापाची सुटका करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर दुसरा तरूण हा बाल्कनीच्या बाहेरून चढला आहे आणि सापाला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. या दोन्ही तरूणांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या सापाची बाल्कनीच्या ग्रीलमधून सुटका झाली आहे. या सुटकेनंतर साप थेट ग्रीलमधून खाली कोसळला आहे.
हे वाचलं का?
A huge snake was spotted at a Thane Building, it was rescued by two brave persons, rescue video. 👇. #thane #mumbai pic.twitter.com/j2ZWrs9mR9
— Sneha (@QueenofThane) September 25, 2023
या संपूर्ण रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडिओ एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ठाण्यातील एका इमारतीतील असल्याचा दावा केला जात आहे.
ADVERTISEMENT
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून धक्कादायक कमेंट्स केले आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT