Weather Report: महाराष्ट्रात मान्सून आला, पण अलर्ट मात्र भलत्याच गोष्टीचा.. नेमकं काय घडतंय?
10 June Weather Report: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तिथून पुढे सरकत तो महाराष्ट्रातल्या काही भागात पोहोचला आहे. मात्र, असं असताना अनेक ठिकाणी हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची उत्सुकता वाढली होती. आता नैऋत्य मान्सूनने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली असून पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 8 जूनपर्यंत नैऋत्य मान्सूनने अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भाग तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांपर्यंत प्रगती केली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि कोकणातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत त्याची आगेकूच आणखी वाढणार आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने जाहीर केलेल्या पर्जन्यमान नकाशानुसार कोकण-गोवा आणि किनारी कर्नाटक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांना निळ्या रंगाने दर्शविण्यात आले असून सर्वाधिक पावसाचा अंदाज याच भागांसाठी व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Govt Jobs : भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांसाठी हिरवा रंग दर्शविण्यात आला आहे. याचा अर्थ या भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर काही भागांत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.









